
पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, हत्या, मारामारी, गुंडागर्दी, कोयता गँगची दहशत अशा घटना अलिकडच्या काळात वाढल्या असल्याच्या पहायला मिळत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा पुण्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. तरुणाने आधी तरुणीची हत्या केली आणि नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. दरम्यान या तरुणाने तरुणीची हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्प्ष्ट होऊ शकलेलं नाहीये. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. तरुणाने तरुणीची हत्या करत आपलंही जीवन संपवलं आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरात तरुणाने आपल्याच मैत्रिणीची हत्या केली, त्यानंतर त्याने तळेगाव येथे जाऊन स्वत:ही आत्महत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघेही तरुण आणि तरुणी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात कामाला होते. गणेश काळे वय 28 असं या तरुणीची हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे, त्याने देखील नंतर आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही, मात्र प्रेम संबंधातून तरुणाने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आरोपी तरुण गणेश काळे हा मुळ बीडचा रहिवासी आहे, तर ही तरुणी पुण्यातीलच रहिवासी होती. ते दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. त्या दोघांमध्ये मैत्री होती. ते गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात नोकरीला होते. समोर आलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी काही कारणांमुळे वाद झाला होता, म्हणून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झालं असावं असा संशय पोलिसांना आहे, या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली .