दोन मुलांसोबत खोलीत एक तरुणी आढळली, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, थेट..
शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. त्यातच आता थेट एका तरुणीचे नाव पुढे येत आहे. आदल्यादिवशी धक्कादायक घटना घडली होती, त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसतोय.

ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणात विविध खुलासे होत आहेत. तपासाला वेग आला असून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर आरोप केली जात आहेत. मात्र, मिनाक्षी शिंदे यांनी अगोदरच स्पष्ट केले की, आपला या प्रकरणात काहीच संबंध नाही. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. काहीच पुरावे नसताना हे आरोप होत आहेत. मी अधिक या प्रकरणात बोलू शकत नाही. मी जे काही आहे ते पोलिसांना सहकार्य करेल. दिशा सालियान प्रकरणात अगोदर आदित्य ठाकरेंना अटक करा आणि मग माझ्यावर आरोप करा असे त्यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गटाकडून हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. शूटरही पोलिसांच्या ताब्यात आहे. पूर्णकर कुटुंबियांकडून मोठे आरोप केली जात आहेत.
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले होते. सुषमा अंधारे यांनीही पूर्णेकर कुटुंबियांनी भेट घेतली. त्यातच आता प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी काही मोठे खुलासे आपल्या जबाबात केली. राम पूर्णेकर यांनी आपल्या जबाबात म्हटले की, या प्रकरणाच्या एक दिवस अगोदर एक तरुणी दोन मुलांसोबत एका खलीत आढळून आली होती.
माझ्या वडिलांनी याविरोधात आवाज उठवला होता. त्यादिवशी आणि त्यानंतर ही तरुणी कार्यालयाबाहेर दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केला. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात या तरुणीचा काही संबंध तर नाही ना या दिशेने पोलिस तपास करत आहेत. कारण प्रदीप पूर्णेकर यांनी यावरून जाब विचारला होता.
या प्रकरणाच्या एक दिवस अगोदरचीच ही घटना आहे. ती तरुणी चक्कार मारत होती. राम पूर्णेकर यांच्या जबाबाने एकच खळबळ उडाली. हेच नाही तर राम पूर्णेकर यांनी केलेल्या खुलाशानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीला चाैकशीसाठीही बोलावले होते. हा या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणावा लागेल. या तरुणीचा या प्रकारासोबत काही संबंध आहे का? याची माहिती पुढे येऊ शकते.