AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasant Davkhare case: मोठा बातमी! वसंत डावखरे प्रकरणाचा 17 वर्षांनी निकाल, उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांची निर्दोष मुक्तता

Vasant Davkhare case result: वसंत डावखरे प्रकरणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

Vasant Davkhare case: मोठा बातमी! वसंत डावखरे प्रकरणाचा 17 वर्षांनी निकाल, उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांची निर्दोष मुक्तता
Vasand Dawkhare CaseImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 1:04 PM
Share

गेल्या 17 वर्षापासून राज्यात दिवंगत नेते वसंत डावखरे प्रकरण चर्चेत होते. या प्रकरणाचा आज अंतिम निकाल समोर आला आहे. या प्रकरणातील कथित आरोपी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी 20 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे VCद्वारे जबाब नोंदवला होता. आता अंतिम निकालात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची निर्दोष सुटका करण्यात आली.

2009 लोकसभा निवडणुकीनंतर दाखल झालेल्या मानहानी प्रकरणाचा आज निकाल लागला. कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “17 वर्षांनंतर आम्हाला न्याय मिळाला, याचा आनंद आहे,” असे ते म्हणाले. स्वर्गीय वसंत डावखरे यांच्याबद्दल आदर कायम असल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले.

दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर कल्याण न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. साक्षी, पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद तपासल्यानंतर हा निकाल आला आहे. प्रकरण राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद. काही साक्षींमध्ये विसंगती असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडल्याचे वकील जयेश वाणी यांनी म्हटले. जयेश वाणी उद्धव ठाकरे यांचे वकील होते. निकालानंतर “सत्याचा विजय झाला” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

2009च्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडीओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. आता या प्रकरणी त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली.

Follow Us
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन