AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 13 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच, नरेंद्र मोदी, भाजप यांच्यासह राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी रोखठोक मतं मांडली. राज ठाकरे यांच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे : मी गेल्या कित्येक दिवसात पत्रकारांना भेटलोच नाही तरीही तेच ठरवतात की मी म्हणे […]

राज ठाकरेंच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 13 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच, नरेंद्र मोदी, भाजप यांच्यासह राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी रोखठोक मतं मांडली.

राज ठाकरे यांच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे :

  1. मी गेल्या कित्येक दिवसात पत्रकारांना भेटलोच नाही तरीही तेच ठरवतात की मी म्हणे लोकसभेच्या २ जागा मागितल्या, २ जागा मागितल्या. लोकसभेचं काय हे मी नंतर तुम्हाला सांगेन – राज ठाकरे
  2. लोकांची स्मरणशक्ती कमी असते, अगदी वर्तमानपत्रातील लोकांना देखील आठवड्यापूर्वी काय घडलं हे आठवत नसतं. लोकांनी विसरून जावं हीच भाजप सरकारची इच्छा आहे म्हणून त्यांनी काय काय करून ठेवलंय,ह्याची आठवण करून द्यायची आहे – राज ठाकरे
  3. मी कोल्हापूरला जे बोललो त्यावर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या फुटत होत्या. नरेंद्र मोदींच्या आयटी सेलमधली लावारीस मुलं वाट्टेल ते पसरवत होती. – राज ठाकरे
  4. अनेक रिकामटेकडे युद्ध झालं पाहिजे, पाकिस्तान मध्ये घुसलं पाहिजे अशा गप्पा सुरु होत्या, आणि हे बोलणारे कोण तर दिवाळीत फटाके फुटले तर घाबरणारी ही लोकं आणि निघाले युद्धाच्या गप्पा करायला – राज ठाकरे
  5. अजित डोवल कोण आहेत, हे राज ठाकरेंना माहित आहे का असं लोकं विचारतात. हो मला माहित आहे. कॅरेवन ह्या मासिकावर १००० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारे विवेक डोवल ह्यांची मुलं. अजित डोवालची मुलं पाकिस्तनी पार्टनर आहे, अरब पार्टनर आहे. हा पार्टनर चालतो का भाजपला?हा देशद्रोही नाही? – राज ठाकरे
  6. नरेंद्र मोदी आणि त्यांचे भारतीय जनता पक्ष हे ठरवणार की राष्ट्रभक्त कोण ते? तुम्हाला कोणी अधिकार दिला हे ठरवण्याचा? नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त ना, मग नवाझ शरीफला त्याच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेले? – राज ठाकरे
  7. २७ डिसेंबर ला अजित डोवाल आणि पाकिस्तनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बँकॉक येथे भेटले. काय झालं ह्या बैठकीत? – राज ठाकरे
  8. पुलवामा येथील हल्ल्यात ४० जवान मारले गेले, आणि आम्ही तरीही प्रश्न नाही विचारायचे? – राज ठाकरे
  9. २०१५ ला कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या आधी मी बोललो होतो की हे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. मी ज्योतिषी नाही पण भाजप काय काय करू शकते ह्याचा मला अंदाज आहे. राम मंदिरावरून तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला, – राज ठाकरे
  10. पुलवामा येथे जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील जर काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान हकनाक मारले जाणार असतील तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जबाबदार नाहीत का? – राज ठाकरे
  11. पुलवामा नंतर मोदी हसत खेळत शांतता पुरस्कार घ्यायला गेले होते. नोटबंदी केल्या केल्या जपानमध्ये जाऊन कशी भारतीयांची वाट लावली हे सांगणारं भाषण करून आले – राज ठाकरे
  12. सैन्याचं एक वैशिष्ट्य आहे की सैन्याला दिलेलं काम ते शांतपणे आणि चोखपणे करून येतात. सैनिक लढाई जिंकतात किंवा हरतात, ते फक्त योग्य माहितीच्या आधारावर. भारतीय हवाई दलाने त्यांचं काम उत्कृष्टपणे पूर्ण केलं. – राज ठाकरे
  13. ज्या वैमानिकांनी धाडसाने बालाकोट हवाई हल्ले केले, त्या वैमानिकांच्या कर्तृत्वावर शंका घेताय असं म्हणून की राफेल विमान असती तर परिस्थिती वेगळी असती. राफेल घ्या किंवा घेऊ नका, अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं ह्याचं उत्तर द्या – राज ठाकरे
  14. काँग्रेसच्या काळात राफेलची किंमत जितकी होती त्यापेक्षा आत्ता जास्त का आहे? काँग्रेसच्या काळात फक्त राफेलचा सांगाडा विकत घेणार होते आणि मोदींनी इंजिन बसवायला घेतलं म्हणून किंमत वाढली का? – राज ठाकरे
  15. मोदी म्हणाले होते सीमेवरच्या सैन्यापेक्षा व्यापारी जास्त शूर आणि धाडसी असतो. हे बोलताना मोदींना लाज नाही वाटत? – राज ठाकरे
  16. मी आज एक गोष्टीची भीती व्यक्त करतोय, की निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल – राज ठाकरे
  17. राफेल व्यवहाराची कागदपत्र चोरीला जात आहेत, आधी सरकार मान्य करतं की चोरीला गेले, आणि आता म्हणाले कॉपी चोरीला गेली. आणि हिंदू वर्तमानपत्राच्या एन राम हे रोज त्या कागदपत्रातून गौप्य्स्फोट करत आहेत. आज त्यांच्यावर चोरीचा आळ घेत आहेत – राज ठाकरे
  18. भारतीय जनता पक्षाचं नशीब बघा, आज त्यांच्यावर ‘राम’ आणि हिंदू’ उलटला – राज ठाकरे
  19. २५ डिसेंबर २०१५ ला मोदींनी नवाझ शरीफ ह्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवला आणि पुढे ७ दिवसांत पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला. पुढे ३ महिन्यात ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या – राज ठाकरे
  20. उरी हल्ल्यानंतर उत्तराखंड, उत्तरप्रदेशच्या निवडणुका झाल्या, गुरुदासपूर हल्ल्यानंतर १० दिवसात दिल्ली निवडणुका झाल्या – राज ठाकरे
  21. डोकलाम येथील तणावानंतर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या ओरडत होत्या की चायनीज माल बंद करा. मग सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनून आला? आम्हाला कळू तर दे देशद्रोही घरात आहेत का बाहेर? आणि हे ठरवणार देशप्रेमी कोण आणि देशद्रोही कोण ते? – राज ठाकरे
  22. ट्रोल करताना जर नीट टीका केली तर ठीक आहे पण उगाच शिव्या द्यायला लागले तर ट्रोलिंग करणाऱ्यांना घराबाहेर काढून मारा – राज ठाकरे
  23. राफेलची कागदपत्र चोरीला जातात, जुन्या चित्रपटात दाखवत होते ते खोटं वाटायचं, पण असली प्रकरणं बघता ते खरंच वाटायला लागलं – राज ठाकरे
  24. राम आणि हिंदू अंगावर आला, द हिंदू वर्तमानपत्राचा दाखला देत राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला – राज ठाकरे
  25. 25 डिसेंबर 2015 ला नवाज शरीफला केक भरवला, पुढच्या 7 दिवसात 2 जानेवारीला पठाणकोट हवाईतळावर हल्ला झाला. केक बादला का? – राज ठाकरे
  26. मुद्द्याला मुद्दा असेल तर चालेल, थोडासा विरोध चालेल, पण आपल्याला शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारायचं – राज ठाकरे
  27. देशातील पत्रकाराला धोक्याची दिवस, गंमत म्हणून नव्हे तर गांभिर्याने घ्या – राज ठाकरे
  28. आपल्या पक्षाअंतर्गत निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, इतरांशी नव्हे, दोन देतो का , तीन देतो का असे करत नाही, तसे करायला मी काही प्रकाश आंबेडकर नाहीय – राज ठाकरे
  29. देशातील पत्रकाराला धोक्याची दिवस, गंमत म्हणून नव्हे तर गांभिर्याने घ्या – राज ठाकरे
  30. लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो सांगेन, तो तुमच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा असेल, आचारसंहिता लागली की आपण भेटूच – राज ठाकरे

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....