स्थानिक पोलिसांवर आठवलेंचा गंभीर आरोप

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शनिवारी रात्री अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाला गेले असता, प्रविण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. विमको नाका परिसरात रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आठवले प्रमुख पाहुणे होते. यावेळी रामदास आठवले यांनी कार्यक्रमात भाषण केले. त्यानंतर ते स्टेजवरून खाली उतरून गाडीकडे जात …

Ramdas Athawale, स्थानिक पोलिसांवर आठवलेंचा गंभीर आरोप

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शनिवारी रात्री अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाला गेले असता, प्रविण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. विमको नाका परिसरात रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आठवले प्रमुख पाहुणे होते. यावेळी रामदास आठवले यांनी कार्यक्रमात भाषण केले. त्यानंतर ते स्टेजवरून खाली उतरून गाडीकडे जात असताना प्रविण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केली. आठवलेंना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आठवलेंच्या समर्थकांनी पकडलं आणि चांगलाच चोप दिला.

या घटनेनंतर अंबरनाथ व उल्हासनगर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सहा डिसेंबरला रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा होती, काल सुरक्षेचं नेमकं काय झालं माहित नाही. मात्र, आठवले सध्या सुरक्षित आहेत, असे रिपाइंच्या आठवले गटाचे नेते अविनाश महातेकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले.

आठवलेंची प्रतिक्रिया

याप्रकरणी रामदास आठवले म्हणाले की, “मी चांगलं काम करत आहे, म्हणून इतरांना त्याचा त्रास होतो आहे. अंबरनाथमध्ये कार्यक्रम ठिकाणी स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त नव्हता, मी गाडीत बसायला जात असताना पोलिसांनी योग्य ती सुरक्षा पुरवली नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मी जिथे जातो तिथे स्थानिक पोलीस सुरक्षा पुरवत नाहीत.” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच “कार्यकर्त्यांनी राज्यभर शांतता पाळावी, माझा कोणावर संशय नाही, माझं कोणाशी वैर नाही”, असेही आठवले म्हणाले.

कोण आहे प्रविण गोसावी?

या प्रकरणानंतर आरोपी प्रविण गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तो एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे. मात्र त्याने असे का केले, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

आरपीआय कार्यकर्त्यांची महाराष्ट्र बंदची हाक

या घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांचा राग अनावर झालेला पाहायला मिळतो आहे. शनिवारी रात्री मोठ्या संख्येने कार्यकर्ते आठवले यांच्या घराजवळ गोळा झाले होते. हा पूर्वनियोजित कट असून यामागील खऱ्या सूत्रधाराला लवकरात लवकर पकडण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. या प्रकरणाचा निषेध म्हणून रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या (आरपीआय) कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

त्यानंतर आज ठाण्यातील आनंदनगर जकात नाका येथे आठवले समर्थकांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *