धनंजय कुलकर्णीच्या दुकानात 170 शस्त्रं, प्लॅन काय होता?

ठाणे: भाजपचा डोंबिवलीतील पदाधिकाऱ्याच्या दुकानात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. भाजपचा  डोंबिवली जिल्हाउपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीच्या फॅशनेबल वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात तब्बल 170 धारदार शस्त्र सापडली. याप्रकरणी क्राईम ब्रांचने धनंजय कुलकर्णीला बेड्या ठोकल्या आहेत. एवढा मोठा शास्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धनंजय कुलकर्णीला कल्याण कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. मात्र पोलिसांनी त्याची …

धनंजय कुलकर्णीच्या दुकानात 170 शस्त्रं, प्लॅन काय होता?

ठाणे: भाजपचा डोंबिवलीतील पदाधिकाऱ्याच्या दुकानात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. भाजपचा  डोंबिवली जिल्हाउपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीच्या फॅशनेबल वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात तब्बल 170 धारदार शस्त्र सापडली. याप्रकरणी क्राईम ब्रांचने धनंजय कुलकर्णीला बेड्या ठोकल्या आहेत. एवढा मोठा शास्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी धनंजय कुलकर्णीला कल्याण कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. मात्र पोलिसांनी त्याची आज पोलीस कोठडी मागितली. मुंबईहून ही हत्यारं आणून त्याची विक्री करत असल्याची कबुली धनंजय कुलकर्णीने दिली.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन या फॅशनेबल वस्तूच्या दुकानात मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेआठच्या सुमारास धाड टाकून छापेमारी केली.

या छापेमारीत 62 स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स, 38 बटनचाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोयता आणि 9 एयरगनसह मोबाइल आणि काही रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा शस्त्रसाठा हस्तगत केला.

आरोपी दुकानदार धनंजय हा डोंबिवलीतील टिळकनगर परिसरातील न्यू दिपज्योत सोसायटीत राहतो.  त्याचे मानपाडा रोडला महावीर नगरातील अरिहंत बिल्डिंगच्या तळमजल्यावर तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे दुकान आहे. याच दुकानात हा शस्त्रसाठा सापडला. मुंबईहून ही हत्यारं आणून त्याची विक्री करत असल्याची कबुली धनंजय कुलकर्णीने दिली. धनंजयकडून कुणी कुणी हत्यारांची खरेदी केली आणि त्या हत्यारांचा गुन्ह्यामध्ये वापर झाला का याचा तपास आता पोलिसांना करायचा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *