AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीएसएमटी स्टेशनजवळ पूल कोसळला, मृतांचा आकडा पाचवर पोहोचला

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. Pained to hear about the FOB incident near TOI […]

सीएसएमटी स्टेशनजवळ पूल कोसळला, मृतांचा आकडा पाचवर पोहोचला
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मृतांची नावे

अपूर्वा प्रभू (35)

रंजना तांबे (40)

झहीद खान (32)

भक्ती शिंदे (40)

तपेंद्र सिंग (35)

पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच धावाधावा झाली. संध्याकाळच्या वेळी सर्वजण ऑफिसवरुन घरी जाण्यासाठी निघत असतात. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे या पुलाखालून नेहमी वाहनांची रहदारी सुरु असते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पुलावरुन चालत असलेले लोकही खाली कोसळले, शिवाय खालीही अनेक जण उपस्थित होते. अधिकृतपणे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पण प्रत्यक्षदर्शीच्या मते, किमान पाच जण असे होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

सायंकाळी सीएसएमटी स्टेशनला प्रचंड गर्दी असते. चाकरमानी दिवसभर काम करुन घराकडे निघालेली असतात. याच गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा पूल आहे.

पाहा व्हिडीओ

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.