Reduce AC use | एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला, दिवसभरात 11 नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने (corona positive in Maharashtra) वाढली आहे. काल दिवसभरात तब्बल 11 नवे रुग्ण आढळले

Reduce AC use | एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला, दिवसभरात 11 नवे कोरोना रुग्ण
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 5:51 PM

मुंबई :  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने (corona positive in Maharashtra) वाढली आहे. काल दिवसभरात तब्बल 11 नवे रुग्ण आढळले असून, राज्यातील बाधितांची संख्या तब्बल 63 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच याबाबतची माहिती दिली. “काल दिवसभरात 11 रुग्ण वाढले. यामध्ये 10 रुग्ण मुंबईचे तर 1 पुण्याचा नवा रुग्ण आढळला आहे. यापैकी तिघांना संपर्क आल्यामुळे तर परदेशातून आलेल्या 8 जणांना लागण झाल्याची माहिती” राजेश टोपे यांनी दिली. (corona positive in Maharashtra)

आज मी शरद पवारांची भेट घेतली. टेस्टिंग फॅसिलिटी वाढवण्याची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. शरद पवारही  केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोलले. टेस्टिंग लॅब वाढल्याच पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने सर्व मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग सुविधा करण्यास तयार आहोत. केंद्रसरकारच्या अखत्यारितील ICMRI त्यांचे नियम 100 टक्के पाळल्या, तरच आम्हाला परवानग्या द्या अशी मागणी हर्षवर्धनना सांगितली. आम्ही सर्व नियम पाळू, पण किट द्या असा आग्रह केला, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

टेस्टिंग लॅब 3 होत्या त्या आता 7 लॅब कार्यरत आहेत. आणखी 12 ते 15 लॅब हव्या. संपर्क करुन ओळखलं पाहिजे की कोण बाधित आहे आणि त्यांना विलगीकरण करुन त्यांची तपासणी करणं आवश्यक आहे. त्यासाठीच टेस्टिंग लॅब आवश्यक असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

हर्षवर्धन यांनी ICMRI चे प्रमुख डॉ अरविंद भार्गव यांना तशा सूचना दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. टेस्टिंग किट्स या महत्त्वाच्या आहेत. त्यानेच तपास होतो. त्याची मागणी केली आहे, असं टोपे म्हणाले.

काल मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमधील दुकाने, कार्यालये बंद केली. इथे जे कामगार, विद्यार्थी, बिझनेसनिमित्त आले होते,ते घरी जात आहेत. त्यामुळे रेल्वेला गर्दी होत आहे, तिकीटासाठी रांगा लागत आहेत. मी रात्री 11.30 वाजता याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. रेल्वे मंत्र्यांना सांगून जाणाऱ्या वर्गाला जाऊ देण्यासाठी रेल्वेंची संख्या वाढवावी लागणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री आणि पवारांनी मान्य केलंच आहे. जास्त रेल्वे देऊन गर्दी कमी करण्याला प्राधान्य आहे.लोकल ट्रेनच्या बाबतीत हर्षवर्धन यांचं मत आहे की ते बंद करायला हवं. गर्दी कमी होताना दिसत नाही. लोक व्यापार, शिक्षण, कामानिमित्त बाहेर पडतात, मात्र ते बंद केल्यामुळे कमी गर्दी होईल. फक्त आवश्यक सेवाच सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, औषधे, फायरब्रिगेड, स्वच्छता करणारे, पाणीपुरवठा करणारे इतकेच प्रवास करतील. त्याव्यतिरिक्त गर्दी करु नये. जर गर्दी हटली नाही तर मुंबई लोकल बंद करावीच लागेल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला.

खबरदारी म्हणून टेस्टिंग किट्स हव्या

टेस्टिट किट्स कमी आहेत असं नाही, मात्र जर अचानक आकडा वाढला तर त्यावेळी किट्स अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी पळापळ नको म्हणून टेस्टिक किटची मागणी केली आहे, असं टोपे म्हणाले.

आपण फेज टू मध्ये

आपण फेज टू मध्येच आहोत. आता 63 पैकी साधारणत: 12-13 लोकांना संसर्गामुळे बाधा झाली. बाकी जो आकडा आहे तो बाहेरुन इन्फेक्शन घेऊन आले आहेत. बाहेरुन आलेले जास्त आहेत. हा आजा आपला देशाची उत्पत्ती नाही, बाहेरुन आलेला आकडा मोठा आहे. त्यांच्यापासून धोका नको म्हणून खबरदारी घेत आहोत, असं टोपे म्हणाले.

एसीचा वापर कमी करा

एसीचा वापर कमी करावा, हा व्हायरस थंड ठिकाणी वाढतो किंवा त्याचं आयुर्मान एसीमध्ये जास्त असतं. एसीमध्ये विषाणू 7-8 तास जगू शकतो.  एसीच्या कोपऱ्यात राहून त्यामार्फत विषाणू संसर्ग वाढू शकतो. एसीऐवजी खिडकी, फॅनचा वापर करा, असं टोपे म्हणाले.

कडक उन्हात विषाणूचं आयुर्मान कमी आहे. एसीमध्ये 7-8 तास तर उन्हात तास-2 तासात विषाणू मरु शकतो. WHO आणि केंद्राच्या निर्देशानुसार नियमावली जारी केली जाते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 12
  • पुणे – 11
  • मुंबई – 20
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 4
  • कल्याण – 4
  • नवी मुंबई – 3
  • अहमदनगर – 2
  • पनवेल – 1
  • ठाणे -1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • उल्हासनगर – 1 एकूण 65

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
  • मुंबई (1) – 18 मार्च
  • रत्नागिरी (1) – 18 मार्च
  • मुंबई महिला (1) – 19 मार्च
  • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
  • अहमदनगर (1) – 19 मार्च
  • मुंबई (2) – 20 मार्च
  • पुणे (1) – 20 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
  • पुणे (2) – 21 मार्च
  • मुंबई (8) – 21 मार्च
  • यवतमाळ (1) – 21 मार्च
  • कल्याण (1) – 21 मार्च
  • एकूण – 65 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.