पूल दुर्घटना: 42 तासांनी आयुक्तांची मुंबईकरांसाठी केवळ 9 सेकंदाची प्रतिक्रिया

मुंबई: सीएसएमटीजवळच्या पूल दुर्घटनेला जवळपास 42 तास उलटल्यानंतर  अखेर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता उगवले आहेत. अजॉय मेहता यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. अजॉय मेहता यांनी केवळ 9 सेकंदाची प्रतिक्रिया दिली. सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पालिका आयुक्तांनी घटनेच्या तब्बल 42 तासानंतरही तोंड उघडल न्हवतं. […]

पूल दुर्घटना: 42 तासांनी आयुक्तांची मुंबईकरांसाठी केवळ 9 सेकंदाची प्रतिक्रिया
अजोय मेहता
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई: सीएसएमटीजवळच्या पूल दुर्घटनेला जवळपास 42 तास उलटल्यानंतर  अखेर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता उगवले आहेत. अजॉय मेहता यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. अजॉय मेहता यांनी केवळ 9 सेकंदाची प्रतिक्रिया दिली.

सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पालिका आयुक्तांनी घटनेच्या तब्बल 42 तासानंतरही तोंड उघडल न्हवतं. अखेर पालिका आयुक्तांनी टीव्ही 9 मराठीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

अजॉय मेहता यांनी यादुर्घटनेप्रकरणी बैठक घेतल्याचं सांगत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनीही या प्रकरणाची सगळी कागदपत्रे मिळवली असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

आयुक्त काय म्हणाले?

आयुक्त – रिपोर्ट पहिल्यांदा पब्लिक डोमेनमध्ये ठेवला आहे, लोकांना पाहायला  (4 सेकंद)

रिपोर्टर – दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल झाला आहे.

आयुक्त – त्यांची डिटेल चौकशी सुरु आहे, त्यामध्ये अजून कोणी सापडलं तर कारवाई होईल (3 सेकंद)

रिपोर्टर – तुम्ही बैठक वगैरे घेऊन काही चौकशी करणार?

आयुक्त – आज सकाळी झाली बैठक (2 सेकंद)

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता  ए. आर. पाटील आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुख्य अभियंता एस. ओ. कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.  या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांत कलम 304 ए अंतर्गत रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याचिकेवर 22 मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

आयुक्तांवर कारवाईची मागणी

मुंबईत काल रात्री घडलेल्या सीएसएमटी पुलाच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अजॉय मेहता आणि पालिकेचा इंजिनिअरिंग विभागच दोषी असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता होत आहे. मुंबई पालिकेचा कारभार जरी शिवसेनेच्या हाती असला तरी महापौरांना कोणतेही अधिकार नाहीत. सगळे अधिकार आयुक्तांच्या हाती असतात. एखादी रेल्वे दुर्घटना झाल्यावर जशी रेल्वेमंत्र्यांवर कारवाई होते, तशी आयुक्तांवर का होत नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे.

बीएमसीचे प्रशासकीय प्रमुख असलेले महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी अजून कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. प्रशासकीय प्रमुख या नात्याने ऑडिट झाल्यानंतरही ही दुर्घटना का झाली, किंवा या आडिटला आयुक्तांनी मान्यता का दिली, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आयुक्त सध्या माध्यमांपासून पळ काढत आहेत.

दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील (CSMT) पादचारी ब्रिज कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला . तर 34 जण जखमी आहेत. गुरुवारी 14 मार्च रोजी ही दुर्घटना घडली.  अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पूल कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मृतांचे नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भेट दिली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, शिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचाही खर्चही राज्य सरकारकडून केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचे आदेश दिले. शिवाय पुलाविषयी आयुक्तांकडून माहिती घेतली. या पुलाचं गेल्या वर्षीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. ऑडिटनंतरही पूल कोसळत असेल तर ही बाब गंभीर आहे. ऑडिटमध्येच दोष होता का याचीही चौकशी होईल आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

संबंधित बातम्या 

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

बीएमसीचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या अजोय मेहतांना अभय का?

IIT मुंबई, बीएमसी आणि रेल्वेकडून सीएसएमटीजवळ पडलेल्या पुलाचं ऑडिट

आयुक्तांना भेटून ऑडिटची मागणी केली होती, पुढे काहीच घडलं नाही : राज ठाकरे

ऑडिटनंतरही पूल कोसळला, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : मुख्यमंत्री

कसाब पुलाने घात केला, चालता चालता पूल कोसळला!

सीएसएमटी स्टेशनजवळ पूल कोसळला, मृतांचा आकडा पाचवर पोहोचला

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.