AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुक्तांना भेटून ऑडिटची मागणी केली होती, पुढे काहीच घडलं नाही : राज ठाकरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या […]

आयुक्तांना भेटून ऑडिटची मागणी केली होती, पुढे काहीच घडलं नाही : राज ठाकरे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात असल्याचं म्हटलंय. शिवाय या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. अगोदर एल्फिनस्टन चेंगराचेंगरी आणि त्यानंतर अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मनसेने सनदशीर मार्गाने ऑडिटची मागणी केली होती, ज्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.

सप्टेंबर 2017 मध्ये एलफिन्टन चेंगराचेंगरीत अनेक मुंबईकरांचा जीव गेला होता. त्यानंतर नंतर अंधेरीतही अशीच एक घटना घडली. मनसेने रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढून ऑडिटची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी ऑडिट करु, असं आश्वासन दिलं. मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून सहकार्याची मागणी केली. पण पुढे काहीच घडलं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश देणाऱ्या रेल्वेमंत्र्यांवरही राज ठाकरेंनी रोष व्यक्त केलाय. ट्विटरवरुन नेहमीप्रमाणे रेल्वे मंत्री चौकशीचे आदेश देऊन टिमकी वाजवतील. मनसेने सनदशीर मार्गाने ऑडिटची मागणी केली होती, पण यांना सनदशीर मार्ग समजत नाही हे दुर्दैवं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भेट दिली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, शिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचाही खर्चही राज्य सरकारकडून केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांनी घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचे आदेश दिले. शिवाय पुलाविषयी आयुक्तांकडून माहिती घेतली. या पुलाचं गेल्या वर्षीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. ऑडिटनंतरही पूल कोसळत असेल तर ही बाब गंभीर आहे. ऑडिटमध्येच दोष होता का याचीही चौकशी होईल आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.