AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतही सेनेची ‘डरकाळी’, पक्षाची पहिली शाखा सुरु

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येत शिवेसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन रविवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. अयोध्येत शिवसेनेकडे आकर्षित होऊन अयोध्यावासियांनी थेट शिवसेनेची शाखा स्थापन केली आहे. ही शाखा लक्ष्मण किल्ला परिसरात आहे. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह तेथील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याने संपूर्ण भारतात चर्चा रंगलेली […]

अयोध्येतही सेनेची ‘डरकाळी’, पक्षाची पहिली शाखा सुरु
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येत शिवेसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन रविवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. अयोध्येत शिवसेनेकडे आकर्षित होऊन अयोध्यावासियांनी थेट शिवसेनेची शाखा स्थापन केली आहे. ही शाखा लक्ष्मण किल्ला परिसरात आहे. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह तेथील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याने संपूर्ण भारतात चर्चा रंगलेली आहे. भाजपची गोची करत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हातात घेत थेट अयोध्येत जाऊन केंद्र सरकारकडे राम मंदिर बांधण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे तेथील स्थानिक नागरिकही शिवसेनेकडे आकर्षित झाले आहे. इतके वर्ष रखडलेला राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याने पुन्हा जिवंत झाल्याचे दिसत आहे.

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर महाराष्ट्तून अनेक पक्षातून टीका केली जात आहे मात्र अयोध्येचे नागिरकही उद्धव ठाकरेंचे चाहते झाल्याचे दिसत आहे. अयोध्येत शिवसेनेची शाखा चालू झाल्याने आता पक्षाचे प्रस्थ या परिसरात कायम राहील अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

शिवसेना येणार या भितीने तेथील स्थानिक मुस्लिम बांधव घराला टाळे लावून दोन ते तीन दिवसांसाठी शहर सोडून गेला आहे. पण आता शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन अयोध्येत झाल्यामुळे तिथे शिवसेनेची दहशत किती राहील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ