कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डरचे 10 % काम अपूर्ण; काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक मेगाब्लॉक होणार?

कल्याणच्या पत्रीपुलावर गर्डर बसवण्याचे कामाचा आजचा दुसरा दिवस आहे.

कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डरचे 10 % काम अपूर्ण; काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक मेगाब्लॉक होणार?

कल्याण : कल्याणच्या पत्री पुलावर गर्डर बसवण्याच्या कामाचा आजचा दुसरा दिवस होता (Kalyan Patri Bridge Gardere Work). मात्र 16 मीटर गर्डर ढकलणे बाकी असताना रेल्वेचा मेगाब्लॉक संपला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गर्डरचे उर्वरित काम उद्या म्हणजेच सोमवारी रात्री होण्यासाठी रेल्वेकडे रात्री अर्धा-अर्धा तासाचा मेगाब्लॉक घेऊन काम संपवण्याची मागणी त्यांनी केली, अशी माहिती कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली (Kalyan Patri Bridge Gardere Work).

याबाबत रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांचे म्हणणे आहे की उद्याच्या मेगाब्लॉक संदर्भात अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. या संदर्भात चर्चा सुरु आहे.

200 कर्मचाऱ्यांनी 45 दिवसात तयार केला 100 वर्षीय पूल

कल्याणच्या पत्रीपुल लॉन्चिंगचा आजचा दुसरा दिवस आहे. मात्र, या पुलाचे गर्डर तयार करायला ग्लोबल स्टील या कंपनी प्रबंधनाला भरपूर मेहनत घ्यावी लागली. 700 मेट्रिक टनच्या या कार्डर मध्ये 25 किमी वेल्डिंग, 30 हजार बोल्टचा वापर करण्यात आला आहे.

100 वर्षाहून अधिक हा पूल टिकू शकेल असा दावा ग्लोबल कंपनीचे प्रमुख ऋषी अग्रवाल यांनी केला आहे. कोरोनाकाळात सर्व काही बंद असताना हा गर्डर 45 दिवसात तयार करण्यात आला. या गर्डरच्या कामासाठी 200 कर्मचारी दिवस रात्र काम करत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने या पुलाच्या आराखड्याचे काम पूर्ण होत आहे. सतत मीडियावर येणाऱ्या बातम्या पाहून वेळात पूल तयार करण्याचा मानस असल्याचे ग्लोबल स्टील कंपनीचे संचालक ऋशी अग्रवाल यांनी सांगितले.

Kalyan Patri Bridge Gardere Work

संबंधित बातम्या :

कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डरचे काम सुरु, आदित्य ठाकरेंची उपस्थिती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *