सुप्रिया सुळेंकडून फॅमिली फोटो शेअर, पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या उमेदवार यादीद्वारे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव जाहीर केलं. पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु होती. खुद्द शरद पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीसाठी माढ्यातून माघार घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयात सर्व …

सुप्रिया सुळेंकडून फॅमिली फोटो शेअर, पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या उमेदवार यादीद्वारे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव जाहीर केलं. पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु होती. खुद्द शरद पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीसाठी माढ्यातून माघार घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फॅमिली फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह पार्थ पवार आणि रोहित पवारही एकत्र दिसत आहेत पवार कुटुंबीयात सर्व काही आलबेल असल्याचं या फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न आहे.

पार्थच्या हट्टापोटी शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्याची चर्चा होती. त्यावर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून, शरद पवारांनी माघारीवर पुनर्विचार करण्याचं भावनिक आवाहन केलं होतं.

दुसरीकडे रोहित पवारांनी पार्थ यांचा प्रचार करु असं सांगताना, पार्थनेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला दिला होता.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता, पवार कुटुंबात धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी फॅमिली फोटो शेअर करत, सर्वकाही ठिकठाक असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या फोटोला फन टाईम विथ फॅमिली अर्थात कुटुंबासोबत मौज मजेचा वेळ असं कॅप्शन दिलं आहे.

संबंधित बातम्या

VIDEO:  पार्था, लोकांमध्ये जाऊन कामं कर : रोहित पवार  

सुजय घराघरात पोहोचलाय, पवारांचं नातवासाठी राजकारण: विखे पाटील 

पार्था, लोकांमध्ये जाऊन कामं कर, रोहितचा पार्थ पवारांना सल्ला 

नातू रोहितचं शरद पवारांना भावनिक आवाहन 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *