AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस चालवताना समोरुन मृत्यू धडकला! 2 बस समोरासमोर धड्याsssम, भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद

Tamil Nadu Bus Accident Video : या अपघातामध्ये जखमी झालेल्या 30 प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बस चालवताना समोरुन मृत्यू धडकला! 2 बस समोरासमोर धड्याsssम, भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद
समोरासमोर भीषण धडकImage Credit source: Twitter Video Grab
| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 2:31 PM
Share

चेन्नई : बसमधून (Bus Accident) प्रवास करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अनेकांना ड्रायव्हर केबिनमधून (CCTV of Driver cabin) प्रवास करणं आवडतं. बसच्या ड्रायव्हर केबिनमधून दिसणारा रस्त्याचा व्हू अनेकांना आकर्षित करतो. पण तामिळनाडूत घडलेल्या बसच्या भीषण अपघातानं ड्रायव्हर केबिनमधून प्रवास करणाऱ्यांना हादरवलंय. या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय. अपघाताची ही घटना आहे, तामिळनाडूमधील (Tamil Nadu Accident Video News). सलेम जिल्ह्यात दोन बस एकमेकांसमोर जोरदार धडकल्या. ही धडक इतकी भीषण होती की बस ड्रायव्हर हा थेट सीटवरुन उडाला आणि काचेवर जाऊन आदळला. बसच्या ड्रायव्हर केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरार टिपलाय. सलेम जिल्ह्यामध्ये बसची समोरासमोर धडक झाली आहे. अनेकदा आपण अपघातातील दोन गाड्यांची समोरा समोर झाल्याचं ऐकतो. पण यावेळी तर चक्क बघायलाही मिळालंय. ही टक्कर किती भीषण असते, हे बघायलाही मिळालंय. एएनआय वृत्तसंस्थेनं या अपघाताचा व्हिडीओ शेअर केलाय.

Taminadu Bus Accident CCTV Video News

भीषण अपघात

या अपघातात बसमधील प्रवासीही जखमी झाली आहेत. या संपूर्ण अपघाताची माहिती जाणून घेण्याआधी या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज एकदा पाहूनच घ्या..

पाहा व्हिडीओ :

चुकीच्या लेनमध्ये घुसली बस

चुकीच्या लेनमध्ये आलेल्या बसनं समोरुन येणाऱ्या बसला समोरासमोर जोरात धडक दिली. यावेळी दोन्ही बसचा वेग प्रचंड होता. या अपघातमध्ये बसच्या चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात बसमधील प्रवासीदेखील जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये बस चालकाच्या डोक्यातही तुटलेल्या काचा घुसल्याचं पाहायला मिळालंय.

30 प्रवासी जखमी

दरम्यान, टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातामध्ये जखमी झालेल्या 30 प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक खासबी बस संकेरीहून इडापड्डीला निघाली होती. या मध्ये 30 प्रवासी होता. तर दुसरी बस केएसआर शिक्षण संध्येची होती. ही बस इडापड्डीहून संकेरीला जात होती. या बसमध्ये 55 विद्यार्थी होते. दोन्ही बसची टक्क झाल्यानंतर बस हायवेवर खोळंबल्या. त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूकही खोळंबली होती.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.