Encounter : ऑपरेशन सिंदूरनंतर जवानांचं आणखी एक मोठं ऑपरेशन; जंगलात घुसून 22 नक्षलवाद्यांचा खात्मा?
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील कोटगुडा येथे भारतीय सैन्याने नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे ऑपरेशन राबवले आहे. या कारवाईत 22 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. हे ऑपरेशन खूपच धोकादायक क्षेत्रात पार पडले असून जवानांनी नक्षलवाद्यांचे अनेक बंकर उद्ध्वस्त केले आहेत.

एकीकडे भारतीय सैन्याने अभूतपूर्व कामगिरी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांना आस्मान दाखवलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या नावाने भारताने पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या 9 तळांवर हल्ला चढवला. अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. मध्यरात्री भारताने केलेल्या या स्ट्राईकमुळे देशभरात जल्लोषाचं वातावरण असतानाच भारतीय जवानांनी आणखी एक ऑपरेशन यशस्वी केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील सरेगट्टा येथील जंगलात घुसून जवानांनी 22 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. दाव्यानुसार, या हल्ल्यात सीनियर नक्षलवादी मारले गेले आहेत. तर काही जखमी झाले आहेत. जवानांनी नक्षलवाद्यांच्या बंकरही उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी करेगुट्टा परिसरात सर्चिंग केल्यानंतर 200 हून अधिक आयडी रिकव्हर केली आहेत. करेगुट्टा डोंगरात सुमारे 5 हजार फूट उंचावर जवान तैनात आहेत. त्यामुळे आता नक्षलवाद्यांनी तेलंगना बॉर्डरवरून छत्तीसगडकडे एन्ट्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा थेट सामना जवानांशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सर्वात खतरनाक ऑपरेशन
बाजीपूरमध्ये सुरू असलेलं ऑपरेशन करेगुट्टा किती खतरनाक आहे हे एका व्हायरल व्हिडीओवरून दिसून येतंय. या क्लिपमध्ये दूरपर्यंत उंच डोंगरात रेंजर दिसत आहेत. सशस्त्र जवान या डोंगरात सर्च ऑपरेशन करताना दिसत आहेत. अनेक वर्षापासून बस्तरमधील हे डोंगर आणि जंगल नक्षलवाद्यांचं सेफ झोन राहिलं आहे. नक्षलवाद्यांना हा संपूर्ण दुर्गम परिसर माहीत आहे.
पहिल्यांदाच ऑपरेशन
याच्या आधी या डोंगरात जवानांनी कधीच ऑपरेशन चालवलं नाही. त्यामुळे त्याचा फायदा नक्षलवाद्यांनी उचलला. पण आता परिस्थिती बदलली आहे. जवानांनी अख्खा डोंगरच ताब्यात घेतला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. तसेच त्यांना त्यांचे डावपेचही आखता येत नाहीयेत. बिजापूरच्या उसूर पोलीस ठाणे परिसरातील नीलम सराई, दोबे, नम्बी, दुर्गमगुट्टा आणि करेगुट्टा डोंगराची रेंज आहे. त्यावर ऑपरेशन सुरू आहे. आता या डोंगराला घेरल्यानंतर जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू झालंय.
