दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये मृत्यूचा शिमगा, 25 जणांचा मृत्यू, आकडा आणखी वाढण्याची भीती

| Updated on: Mar 20, 2022 | 10:38 PM

राज्यात बनावट दारु विक्री सुरु असून ही दारु प्यायल्यामुळेच सर्व मृत्यू झाल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली. हे सर्व मृत्यू बनावट दारू प्यायल्यामुळे झाले आहेत. सध्या याबाबत कोणतीही माहिती नाही. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जात आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये मृत्यूचा शिमगा, 25 जणांचा मृत्यू, आकडा आणखी वाढण्याची भीती
दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये मृत्यूचा शिमगा, 25 जणांचा मृत्यू
Image Credit source: twitter
Follow us on

बिहार : होळी आणि धुळवडीचा सण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र बिहारमध्ये या उत्साहाच्या सणाला गालबोट लागले आहे. राज्यातील तीन राज्यात बनावट दारू (Liquor) प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांपैकी 10 जण बांका जिल्ह्यातील आहेत. अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात बनावट दारु विक्री सुरु असून ही दारु प्यायल्यामुळेच सर्व मृत्यू झाल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली. हे सर्व मृत्यू बनावट दारू प्यायल्यामुळे झाले आहेत. सध्या याबाबत कोणतीही माहिती नाही. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जात आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे बांका एसपी अरविंद कुमार गुप्ता यांनी सांगितले. (25 killed in Bihar after drinking poisonous liquor)

भागलपूरमध्येही दारुचे सेवन केल्याने काही लोकांचा मृत्यू

भागलपूरच्या नाथनगर भागातील साहेबगंजमध्येही होळीच्या दिवशी दारुचे सेवन केल्याने चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. संदीप यादव, विनोद सिंह, मिथुन कुमार, नीलेश कुमार अशी मृतांची नावे आहेत. दारु प्यायल्यानंतरच आपल्या पतीची तब्येत बिघडली. त्यानंतर काही हालचाली करण्याआधीच पतीचा मृत्यू झाल्याचे मयत विनोदच्या पत्नीने सांगितले. तसेच एका तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विनोद सिंह याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूरच्या नाथनगर येथील साहेबगंज परिसरात होळीच्या दिवशी सकाळी सर्वजण दारूची बाटली घेऊन घरी आले. त्यानंतर त्यांनी दारू प्यायली. मात्र काही वेळाने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. मृत सर्व एकाच गावातील आहेत. रुग्णालयात दाखल केले असता सर्वांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विषारी दारूमुळेचे हे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर आतापर्यंत फक्त तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृत्यू का आणि कसा झाला ? याची माहिती मिळवत असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

मधेपुरा जिल्ह्यात चौघांचा संशयास्पद मृत्यू

मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंजमध्ये होळीच्या दिवशी विषारी दारु प्यायल्याने 22 जण आजारी पडले आहेत. दारु प्यायल्यानंतर तब्येत खराब झालेल्या सर्वांना मुरलीगंज पीएचसी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यापैकी 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विषारी दारू हे देखील या मृत्यूंमागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी 3 मृत दिघी गावातील असून एक जण मुरलीगंज मुख्य बाजारपेठेतील प्रभाग 9 मधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. (25 killed in Bihar after drinking poisonous liquor)

इतर बातम्या

युनिकॉर्न स्टार्ट-अप समूहावरील छापेमारीत 1 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 22 लाखांचे दागिने जप्त

Nagpur Crime : नागपुरात आठ वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार