जम्मू-काश्मीरमधील चकमकीत लष्कर-ए- तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा; एक एसपीओ शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी सुरक्षा दलाची दोन ठिकाणी अतिरेक्यांसोबत चकमक उडाली. (3 Lashkar terrorists killed in encounter in J&K's Shopian)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:55 AM, 19 Feb 2021
जम्मू-काश्मीरमधील चकमकीत लष्कर-ए- तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा; एक एसपीओ शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी सुरक्षा दलाची दोन ठिकाणी अतिरेक्यांसोबत चकमक उडाली. शोपियांमध्ये झालेल्या पहिल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मारले गेलेले तिन्ही अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचे होते. दुसरं एन्काऊंटर बडगाम येथे झालं. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एसपीओ शहीद झाला. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू आहे. (3 Lashkar terrorists killed in encounter in J&K’s Shopian)

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शोपियांमध्ये रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. ही चकमक आज सकाळपर्यंत सुरू होती. या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. यावेळी सुरक्षा दलाने अतिरेक्यांकडी मोठ्या प्रमाणावरील शस्त्रसाठा जप्त केला. या चकमकीनंतर आता संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. शोपियांमध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून संयुक्त कारवाई केली.

सर्च ऑपरेशन सुरू

शोपियांमध्ये चकमक सुरू असतानाच बडगाममध्येही सुरक्षा दल, पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये जोरदरा चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एसपीओ अल्ताफ अहमद हे शहीद झाले. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

शस्त्रसाठा जप्त

यापूर्वी 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी भारतीय सेना आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक संयुक्त मोहीम हाती घेऊन या परिसरातील जंगलांमधुन मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला होता. लष्कराला अतिरेक्यांच्या संदिग्ध कारवायांबाबतची टिप मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात एके-47, एसएलआर रायफल, 303 रायफल, मॅगेझीनसह दोन पिस्तुल, चार यूबीजीएल ग्रेनेड, एके 47 काडतुसे आणि रेडिओ सेटचा एक बॉक्स यावेळी जप्त करण्यात आला होता.

गेल्या वर्षी 221 दहशतवाद्यांना कंठस्नान

गेल्यावर्षी काश्मीर खोऱ्यात दहतवाद विरोधी अभियानांतर्गत 221 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. 2019मध्ये 153, 2018मध्ये 215 आणि 2017मध्ये 213 अतिरेकी मारले गेले होते. अतिरेक्यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा करण्यात आला असला तरी अतिरेक्यांची संख्या तितक्याच प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी 166 स्थानिक लोक अतिरेक्यांच्या संघटनांमध्ये सामिल झाले होते. 2019मध्ये 119 स्थानिकांनी तर 2018मध्ये 219 स्थानिकांनी अतिरेकी संघटनांमध्ये सहभाग घेतला होता. (3 Lashkar terrorists killed in encounter in J&K’s Shopian)

 

संबंधित बातम्या:

गलवान खोऱ्यात चार सैनिक मारले गेले, चीनने वर्षभरानंतर दिली कबुली

ना सैन्य कारवाई, ना गोळीबार, अफगाणिस्तानमध्ये अजब पद्धतीने 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू, कारण काय?

नेपाळ सरकारचं नव फर्मान काय? महिला का उतरल्या रस्त्यावर?

(3 Lashkar terrorists killed in encounter in J&K’s Shopian)