ना सैन्य कारवाई, ना गोळीबार, अफगाणिस्तानमध्ये अजब पद्धतीने 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू, कारण काय?

अफगाणिस्तानमध्ये 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय.

ना सैन्य कारवाई, ना गोळीबार, अफगाणिस्तानमध्ये अजब पद्धतीने 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू, कारण काय?
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 4:30 PM

काबुल : असं म्हणतात की जो कुणी वाईट काम करतो त्याला आपल्या चुकीच्या कामाची शिक्षा मिळते. हे प्रत्येकवेळा खरं होतंच असं नाही, पण अफगाणिस्तानमध्ये एका घटनेबाबत हे खरं ठरलंय. अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानी (Taliban) दहशतवादी (Terrorist) एका मशिदीत बॉम्ब बनवत होते. सोबतच इतरांना याचं प्रशिक्षणही देण्यात येत होतं. हे करत असताना या तालिबानी बॉम्ब क्लासमध्येच बॉम्बस्फोट झाला आणि 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय. ही घटना अफगाणिस्तानमधील बाल्ख प्रांतातील आहे. अफगाणिस्तान सैन्याने या घटनेला दुजोरा दिला असून मृतांमध्ये 6 जण परदेशी नागरिक असल्याचंही म्हटलं (30 terrorist death due to blast in bomb making training in Afghanistan).

अफगाणिस्तान सैन्यानं म्हटलं आहे, “तालिबानी दहशतवाद्यांच्या एका गटाला दौलताबाद जिल्ह्यातील क्वाल्टा गावात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाला आणि त्यात तेथे उपस्थित असलेल्या 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 परदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे.” स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या अहवालानुसार, तालिबानी दहशतवादी गावातील एका मशिदीत जमा झाले होते. तेथे त्यांना रस्त्यावर पेरण्यात येणाऱ्या आयडी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं.

अशा घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात दहशदवाद्यांच्या मृत्यूची पहिलीच घटना

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान म्हणाले, “स्फोटानंतर घटनास्ळावर कुणीही जीवंत राहिलेलं नाही. हा एक मोठा आणि धोकादायक स्फोट होता. आधी या प्रकारच्या घटनांमध्ये 6, 8 किंवा 10 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, यावेळी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत दहशतवादी मारले गेलेत.” दुसरीकडे दहशतवादी संघटना तालिबानने या घटनेला दुजोरा दिलाय. असं असलं तरी तालिबानने या स्फोटात त्यांचे किती दहशतवादी मारले गेले यावर अवाक्षरही काढलेलं नाही.

हेही वाचा :

भारतीय कोरोना व्हॅक्सीनला अफगानिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, अलकायदा आणि तालिबानकडून कुरापती का?

कंधारमध्ये तालिबानच्या 90 दहशतवाद्यांचा खात्मा, अफगाणिस्तान सरकारचा दावा

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट, 62 जणांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

30 terrorist death due to blast in bomb making training in Afghanistan

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.