AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळ सरकारचं नव फर्मान काय? महिला का उतरल्या रस्त्यावर?

नेपाळमधील महिला देखील रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. Nepal Government new law for women

नेपाळ सरकारचं नव फर्मान काय? महिला का उतरल्या रस्त्यावर?
नेपाळच्या महिलांचं आंदोलन
| Updated on: Feb 16, 2021 | 5:37 PM
Share

काठमांडू : नेपाळ सध्या राजकीय अस्थिरतेतून जात आहे. आता नेपाळमधील महिला देखील रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आम्हाला श्वास घेण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागेल का?, असा सवाल उपस्थित करत नेपाळच्या महिला शासनाला आव्हान देत आहेत. काठमांडूच्या रस्त्यांवर महिलांचं आंदोलन सुरुच आहे. महिला नेपाळच्या सिंह दरबार पॅलेसकडे अधिकारांच्या लढाईसाठी स्त्री स्वातंत्र्याच्या घोषणा देत आगेकूच करत आहेत. (Nepal Government suggest new law for women less than 40 need permission to travel abroad)

40 वर्षाखालील महिलांना परदेशात जाण्यासाठी परवानगीची गरज

नेपाळ सरकार आगामी काळात महिलांच्या परदेशवारी संदर्भात नवं धोरण आणण्याच्या तयारीत आहे. नेपाळमधील 40 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या महिलांना कुटुंबातील व्यक्ती किंवा वार्ड ऑफिसची परवानगी घ्यावी लागेल. यापूर्वी इराणमध्ये महिलांच्या आतंरराष्ट्रीय प्रवासासाठी निर्बंध होते. मात्र, त्यानंतर ते हटवण्यात आले. इराणनंतर नेपाळ पुरुषसत्ताक मानसिकता दाखवणारा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. नेपाळमध्ये हा नियम लागू झाल्यास तेथील महिलांना कुटुंबातील प्रमुख सदस्याच्या लेखी अनुमतीशिवाय परदेशात प्रवास करता येणार नाही.

परदेशात जाण्यासाठी 9 लाखांचा विमा

नेपाळच्या कोणत्याही महिलेला पदेशात जायचं असेल तर भारतीय चलनात 9 लाख रुपये तर नेपाळी चलनात 15 लाख रुपयांचा विमा काढावा लागणार आहे. काठमांडू पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांच्या सुरक्षेला जास्त धोका असतो. यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाविषयी सरकारकडे असावे, अशी भूमिका असल्याचं म्हटलं आहे.

कुटुंबातील व्यक्तीच्या परवानगीमुळं सरकारला कोणती नवी माहिती मिळणार आहे, असा सवाल आंदोलक महिलांनी केला आहे. नेपाळी महिलांनी सरकारच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. ट्विटरवर सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या महिलांनी रस्त्यावरच्या लढाईला देखील सुरुवात केली आहे. नेपाळच्या माजी मानवाधिकार आयुक्त मोहना अन्सारी यांनी हा काळाच्या मागे घेऊन जाणारा निर्णय असल्याचं म्हटलं आहे. नेपाळच्या स्त्रीविरोधी सरकारविरोधात महिलांनी जोरदार आंदोलन सुरु केलं आहे.

संबंधित बातम्या:

नितीन गडकरी नेमकी कोणती रिस्क घेत नाहीत? वाचा ते काय म्हणाले…

MSP कायम ठेवणार, सरकारचं आश्वासन; कायदेच रद्द करा, शेतकरी मागणीवर ठाम

(Nepal Government suggest new law for women less than 40 need permission to travel abroad)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.