AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या लग्नाला नक्की यायचं’; लग्नपत्रिका उघडताच तरुणाला फुटला दरदरून घाम, हातपाय पडले थंडगार, धक्कादायक प्रकार

एखाद्या कुटुंबामध्ये कोणाचं लग्न ठरलं असेल तर त्या कुटुंबात आनंदाचं, उत्साहाच वातावरण असतं. त्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या नातवाईकांना लग्नपत्रिका पाठवतात. याचदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

'माझ्या लग्नाला नक्की यायचं'; लग्नपत्रिका उघडताच तरुणाला फुटला दरदरून घाम, हातपाय पडले थंडगार, धक्कादायक प्रकार
| Updated on: Feb 22, 2025 | 3:35 PM
Share

एखाद्या कुटुंबामध्ये कोणाचं लग्न ठरलं असेल तर त्या कुटुंबात आनंदाचं, उत्साहाच वातावरण असतं. त्या कुटुंबातील व्यक्ती मोठ्या उत्साहानं आपल्या नातेवाईकांना विवाहाचं निमंत्रण देण्यासाठी लग्न पत्रिका पाठवतात. सध्या डिजिटल युग आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी निमंत्रण पत्रिका प्रिंट करण्याऐवजी डिजिटल माध्यमातूनच पाठवली जाते. मात्र याचाच फायदा आता सायबर गुन्हेगार घेताना दिसत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या व्हॉट्सअपवर लग्नाचं निमंत्रण देणारी पत्रिका किंवा एखाद्या सण उत्सवाचा शुभेच्छा संदेश येतो. तो ओपन करताच अख्ख बँक खातं रिकामं होतं. असा प्रसंग अनेकांसोबत घडला आहे.अशीच एक घटना आता गुजरातमधून समोर आली आहे.

राजकोटच्या कोलीथड गावाचे रहिवासी असलेल्या रियाज भाई गाला यांना 14 फेब्रुवारी रोजी त्याच्या फोनवर एक मेसेज आला. हा मेसेज लग्नाच्या निमंत्रणाचा होता. रियाज भाई यांचेच नातेवाईक असलेल्या ईशान भाई यांनी हा मेसेज पाठवला होता. माझ्या लग्नाला नक्की या असा हा मेसेज होता. सोबतच एक पीडीएफ फाईल देखील पाठवण्यात आली होती. जेव्हा रियाज भाई यांनी ही पीडीएफ फाईल ओपन केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. पीडीएफ ओपन करताच त्यांचं बँक अकाऊंट पूर्ण रिकामं झालं होतं. 75,000 हजार रुपये त्यांच्या खात्यामधून अचानक गायब झाले होते. मेसेज पाहाताच त्यांना प्रचंड धक्का बसला.

जेव्हा त्यांनी ही पीडीएफ फाईल ओपन केली तेव्हा त्यांच्या मोबाईलचा कंट्रोल हा सायबर गुन्हेगारांकडे गेला, आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच त्यांचं बँक अकाउंट रिकामं करण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार हे या गावातील पहिलंच प्रकरण नव्हतं तर यापूर्वी देखील त्या गावातील शेतकऱ्यासोबत देखील असाच प्रकार घडला होता. त्यांच्या खात्यातून 24 हजार रुपये गायब झाले होते.

दुसरीकडे केरळमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे, एक वृद्ध व्यक्ती पाच लाख रुपये घेऊन घाई-घाई बँकेत आला. मला माझ्या मामाला पैसे सेंड करायचे आहेत, असं त्याने बँकेतील कर्मचाऱ्याला सांगितलं. मात्र बँक कर्मचाऱ्याला संशय आल्यानं त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितलं की माझी पत्नी सीबीआयच्या डिजिटल अरेस्टमध्ये आहे. आणि पैसे पाठवले नाहीत तर ते तिला सोडणार नाहीत. बँकेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?