AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलं कोव्हिडच्या विळख्यात, प्रत्येक जिल्हात हवं स्वतंत्र रुग्णालय, 81% भारतीयांची मागणी

कोव्हिड संसर्गाचा फटका लहान मुलांनाही बसला आहे. बाधितांच्या संख्येत पंधरा वर्षांखालील मुलांची आकडेवारी वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी आरोग्य केंद्रात मुलांसाठी स्वतंत्र कोव्हिड केंद्रे निर्माण करण्याची मागणी सर्वेक्षणात करण्यात आली आहे. कोव्हिड संसर्गाचा वेग पाहता एक जानेवारी पर्यंत व्यवस्था उभारण्याचे आवाहनही सर्वेक्षणातून करण्यात आले आहे.

लहान मुलं कोव्हिडच्या विळख्यात, प्रत्येक जिल्हात हवं स्वतंत्र रुग्णालय, 81% भारतीयांची मागणी
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 5:23 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य यंत्रणेनं कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. कोव्हिड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांचे निर्देश जारी केले आहेत. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात कोव्हिड समर्पित आरोग्यकेंद्रांची उभारणी करण्याची आवश्यकता नागरिकांच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. पर्याप्त कर्मचारी आणि स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. ‘लोकल सर्कल’ने केलेल्या सर्वेक्षणात निष्कर्ष आढळून आले आहेत. (81 parent people demand dedicated covid hospital for children in local circle survey)

कोविड संसर्गाचा फटका लहान मुलांनाही बसला आहे. बाधितांच्या संख्येत पंधरा वर्षांखालील मुलांची आकडेवारी वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी आरोग्य केंद्रात मुलांसाठी स्वतंत्र कोविड केंद्रे निर्माण करण्याची मागणी सर्वेक्षणात करण्यात आली आहे. कोविड संसर्गाचा वेग पाहता एक जानेवारी पर्यंत व्यवस्था उभारण्याचे आवाहनही सर्वेक्षणातून करण्यात आले आहे. सर्वेक्षणात 9588 जणांनी यावर सहमती दर्शविली आहे.

लहान मुलांसाठी डेडीकेटेड आरोग्यकेंद्र

सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या संसर्गतेला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने गतिमान पावले उचलण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पर्याप्त कर्मचारी आणि स्वतंत्र निधी पुरवठ्यासह स्थायी किंवा अस्थायी स्वरुपात मुलांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्राची मागणी केली आहे. तब्बल 81 भारतीयांनी यासाठी आग्रह दर्शविला आहे. सर्वेक्षणातील 59 नागरिकांनी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे तर 23 जणांनी काही मर्यादेपर्यंत महत्वपूर्ण आणि 11 जणांनी आवश्यकता नसल्याचे मत नोंदविले आहे.

पर्याप्त आणि प्रशिक्षित कर्मचारी

कोविड प्रकोपाच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय सेवांच्या पूर्ततेसाठी पर्याप्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात पुरेश्या आणि प्रशिक्षित स्वरुपात कर्मचाऱ्यांची मागणी सर्वेक्षणातून नोंदविण्यात आली आहे.

काय आहे ‘लोकल सर्कल’?

प्रशासन, समाज आणि नागरी समस्यांचा आढावा घेणारे ‘लोकल सर्कल’ ऑनलाईन व्यासपीठ आहे. विविध विषयांवर ऑनलाईन सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनमताचा कानोसा घेतला जातो. आतापर्यंत ‘लोकल सर्कल’ने विविध विषयांवर सर्वेक्षण अहवाल सादर केले आहेत.कोविडनंतरची आर्थिक परिस्थिती, दिल्लीतील नागरी समस्या, मास्कचा वापर आदी विषयांवरील सर्वेक्षणातून देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

इतर बातम्या

Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी एका क्लिकवर

Sindhudurg Bank Election Result | ‘राणें’चा विजय, पण भाजप उमेदवार पराभूत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील interesting निकाल

(81 parent people demand dedicated covid hospital for children in local circle survey)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.