AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 वर्षांचा अक्षीत २०० फूट खोल बोअरवेलमध्ये फसला, सात तास चालले रेस्क्यू ऑपरेशन

सर्वात पहिल्यांदा बोअरवेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला. मुलावर लक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर मुलाला ऑक्सिजन पोहचविण्यात आले.

9 वर्षांचा अक्षीत २०० फूट खोल बोअरवेलमध्ये फसला, सात तास चालले रेस्क्यू ऑपरेशन
| Updated on: May 20, 2023 | 7:52 PM
Share

जयपूर : शनिवारी सकाळी सात वाजता ९ वर्षांचा अक्षीत २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. तो सुमारे ७० फूट खोलामध्ये फसला होता. सात तासांच्या रिक्स्यू ऑपरेशननंतर त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तो बोअरवेलमध्ये सुमारे सात तास राहिला. सिव्हिल डिफेन्स आणि एनडीआरएफच्या टीमने लोखंडी जाळीच्या मदतीने त्याला बाहरे काढले. ही लोखंडी जाळी अक्षीतच्या पाठीमागून खाली जाऊन खुलली. ही अशी लोखंडी जाळी होती त्या आधारे तो त्या जाळीवर बसू शकत होता किंवा दोन्ही पाय जाळीवर ठेवू शकत होता. बाहेर काढल्यानंतर अक्षीतला रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याची प्रकृती आता बरी आहे.

बोअरवेलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आला

घटनेची माहिती एसडीआरएफला देण्यात आली. सर्वात पहिल्यांदा बोअरवेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला. मुलावर लक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर मुलाला ऑक्सिजन पोहचविण्यात आले. या सर्व मोहिमेदरम्यान त्याची स्थिती सामान्य होती. सिव्हिल डिफेन्सच्या डेप्टी कमांडर अमित यांनी सांगितले की, मुलासोबत बोलणं सुरू होतं. तो चांगला रिस्पान्स देत होता. तो बेहोश झाला नव्हता. खाली खूप गर्मी होत होती. त्यामुळे त्याच्यासाठी पाणी आणि ज्युसची व्यवस्था करण्यात आली.

आई-वडील म्हणाले, खूप भीती वाटत होती

अक्षीतचे आईवडील खूप रडत होते. त्याचे वडील फुलचंद म्हणाले, खूप भीती वाटत होती. कारण अक्षीतला श्वास घेण्यास अडचण येत होती. परंतु, रिक्स्यू टीमने त्यांना आश्वस्त केले की, ते अक्षीतला लवकरच बाहेर काढतील. सात वाजता अक्षीत बोअरवेलमध्ये पडला. कुटुंबीयांनी पोलीस कंट्रोल रूम जयपूर ग्रामीणला कळवलं.

८ वाजता पोलीस आणि सिव्हिल डिफेन्स टीम घटनास्थळी दाखल झाली. टीमने कंट्रोल रूमला सांगितले की, ऑपरेशनला वेळ लागेल. ९ वाजता एसडीआरएफने रिस्क्यूला सुरुवात केली. लोखंडी जाळीच्या माध्यमातून मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दुपारी बारा वाजता बाजूला खड्डा खोदण्याचे काम सुरू करण्यात आले.

पाईप आणि दोरीने लॉक करून मुलाला बाहेर काढण्यात आले. दहा-दहा फुटावर पाईप बांधण्यात आले. रॉड बोअरवेलमध्ये उतरवण्यात आले. सोबत कॅमेरा जोडला होता. मुलगा जाळीत बसला की नाही, हे कळलं. दोरीवरील नियंत्रण एनडीआरएफच्या टीम सदस्यांकडे होतं.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.