आमीर खान यांचा आंब्याचा बगीचा बघीतला का?, सलमानसह अनेक अभिनेत्यांनी चाखला या बगीच्यातील आंब्यांचा स्वाद

आंब्याच्या चांगल्या व्हेरायटीसाठी शाहाबाद प्रसिद्ध आहे. या आंब्यांना अभिनेत्यांकडून चांगली मागणी आहे. येथील आंब्यांचा स्वाद दिलीप कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान यांनी घेतला आहे.

आमीर खान यांचा आंब्याचा बगीचा बघीतला का?, सलमानसह अनेक अभिनेत्यांनी चाखला या बगीच्यातील आंब्यांचा स्वाद
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:53 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात शाहाबाद कस्बाला आंब्यांचा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखले जाते. शिवाय अभिनेता आमीर खानच्या नावानेही ओळखले जाते. आमीर खानचा पूर्वजांचे घर शाहाबाद येथे आहे. आमीर खान यांचे पूर्वज अख्तियारपूर गावचे राहणारे आहेत. परंतु, सध्या अख्तियारपूर गावात आमीर खान यांचे नातेवाईक राहतात. आमीर खानकडे मोठा आंब्याचा बगीचा आहे. आग्रा, नवाबांचे शहर लखनौ आणि मुंबईसह विदेशातही या आंब्याच्या बगीच्यातील आंबे पुरवले जातात. शाहाबादी आंब्याची झाडं राष्ट्रपती भवनातील बगीच्याची शोभा वाढवतात.

या व्हेरायटीज केल्या विकसित

शाहाबादमध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीचे आंबे आहेत. येथील शेतकऱ्यांनी आंब्याच्या चांगल्या जातीची निवड केली. आंब्याच्या बगीच्याचे मालक बब्बू खान सांगतात की, त्यांचे बगीचे कित्तेक वर्षांपासून आहेत. या बगीच्यांमध्ये हुस्त्र आरा, गुलाब खास, खासुलखास, चुंबक सीसी, गुलाब जामून, आबे हयात, भोगमिया, अंगुरी, शरबती, राम केला आणि राजा गुलाबसह अन्य कित्तेक जातीचे आंबे आहेत. रीसर्च करून वेगवेगळ्या व्हेरायटीज डेव्हलप केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

या अभिनेत्यांनी चाखला आंब्यांचा स्वाद

उत्तर प्रदेशात आंब्यांसाठी मलिहाबाद प्रसिद्ध आहे. पण, आंब्याच्या चांगल्या व्हेरायटीसाठी शाहाबाद प्रसिद्ध आहे. या आंब्यांना अभिनेत्यांकडून चांगली मागणी आहे. येथील आंब्यांचा स्वाद दिलीप कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान यांनी घेतला आहे.

१०० पेक्षा जास्त व्हेरायटीज

आमीर खानच्या बगीच्यात शाहाबाद येथे १०० पेक्षा जास्त व्हेरायटीचे आंबे आहेत. येथील खास आंब्याचा रोप माजी राष्ट्रपती झाकीर हुसैन यांनी राष्ट्रपती भवनातील अशोका गार्डनमध्ये लावला. हरदोई जिल्हाधिकारी मंगला प्रसाद यांनी सांगितले की, उद्यान विभागाच्या वतीनं वारंवार जागरुकता पसरवली जाते. शाहाबाद आंब्याचा ग्रीन बेल्ट आहे. येथील युवक आता आंब्याची हायटेक नर्सरी तयार करत आहेत. नर्सरीसाठी राज्य सरकार ४० टक्के अनुदान देते.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.