4 हात, 4 पाय, 4 कान, नवरात्रात विचित्र जन्म, कुणी म्हणतंय ब्रह्माचा अवतार?

नवरात्रात नवमीच्या दिवशी जन्मलेल्या या बाळामुळे शहरात प्रचंड अफवा पसरल्या. काहींनी हा ब्रह्माचा अवतार म्हणलय तर काहींनी देश आणि समाजासाठी हा अपशकून असल्याचं म्हटलं.

4 हात, 4 पाय, 4 कान, नवरात्रात विचित्र जन्म, कुणी म्हणतंय ब्रह्माचा अवतार?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 2:55 PM

खंडवाः मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडावा इथं मंगळवारी सकाळीच सरकारी रुग्णालयात (Hospital) एका महिलेची प्रसूती झाली. नवरात्रातील (Navratri) नवमीचा दिवस. बाळ जन्मलं. पण त्याला चार हात. चार पाय आणि चार कान होते. हा प्रकार घडल्यानंतर आई-वडिलांना धक्का तर बसलाच. पण शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कुणी म्हणालं देवाचा प्रसाद. कुणी म्हणालं ब्रह्माचा अवतार. तर कुणी समाजासाठी हा अपशकुन मानला…

याविषयी अधिक माहिती अशी की खंडवा जिल्ह्यातील मूंदी येथील सरकारी रुग्णालयात ही महिला काल रात्री भर्ती झाली. जवळच्याच शिवरिया गावातील ती रहिवासी आहे.

आज सकाळी नवमीच्या दिवशी बाळाचा जन्म झाला. पण त्याला चार हात, चार पाय, चार कान होते.

जन्मतःच बाळाची प्रकृती चांगली होती. मात्र अर्ध्या तासानेच त्याचा मृत्यू झाला. पण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांद्वारे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

सोशल मीडियावरही पोस्ट टाकल्या गेल्या. त्यामुळे यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.

हे बाळ पाहण्यासाठी रुग्णालयात तोबा गर्दी उलटली. त्यानंतर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीसही बोलवावे लागले.

या बाळाला जन्म देणारी ३२ वर्षीय महिला गुलका बाई आणि तिचे पती राहुल गार्वे हे दोघे दिव्यांग आहेत.

राहुल गार्वे यांची दृष्टी अधू आहे तर गुलका बाई दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. मोलमजुरी करून हे दोघं पोट भरतात. त्यांना एक वर्षाची मुलगीदेखील आहे.

शिवरियातील आशा कार्यकर्त्यांनी सांगितलं की, या महिलेला नियमितपणे आयर्नच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. योग्य लसीकरणही झालं होतं. काही दिवसांपूर्वी सोनोग्राफीही केली होती.

सोनोग्राफीतच बाळ अविकसित असल्याचं कळलं होतं. त्यानंतर तिला गर्भपात करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र महिलेने नकार दिला होता. या बाळासाठी तिने कोणत्याही बुवा बाबाचा सल्ला घेतला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

या बाळावरून लोक अनेक चर्चा करत असल्या तरी डॉक्टरांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. शांता तिर्की म्हणाल्या, गर्भवती महिलांनी वेळेवर तपासण्या केल्या नाही तर अशा घटना घडतात. बहुतांश वेळा असे अविकसित बाळं जिवंत राहत नाहीत.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.