अवघ्या १३ वर्षांचा मुलगा, JPSC निदर्शनात सरकारला प्रश्न विचारतोय, इंग्रजी ऐकून लोक झाले आश्चर्यचकीत

झारखंड येथे परीक्षेतील घोटाळ्यावरुन शेकडो विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.या आंदोलनात इयत्ता सहावीतील एका विद्यार्थ्याच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जंतरमंतरवरील इरफान सारखा हा विद्यार्थी व्हायरल झाला आहे.

अवघ्या १३ वर्षांचा मुलगा, JPSC निदर्शनात सरकारला प्रश्न विचारतोय, इंग्रजी ऐकून लोक झाले आश्चर्यचकीत
JPSC boy viral new
| Updated on: Aug 08, 2026 | 4:25 PM

झारखंड येथे शेकडो विद्यार्थी परीक्षेतील घोटाळ्यावरुन निदर्शने करीत आहेत. या दरम्यान १३ वर्षाचा सहावीत शिकलेला विद्यार्थी सध्या व्हायरल होत आहे. हा विद्यार्थी सरकारला थेट सवाल करीत आहे. फर्राटेदार इंग्रजीत संभाषण करत आहे. या विद्यार्थ्याला पाहून जंतरमंतरवर व्हायरल झालेल्या इरफानची आठवण काढत आहेत. नेमके या विद्यार्थ्याचे कौतूक लोक का करत आहेत.

कोण आहे हा 13 वर्षांचा मुलगा ?

दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलन क्षमते न क्षमतेच झारखंडच्या रांची येथील विद्यार्थ्यांची निदर्शने सुरु आहेत. स्टुडन्ट प्रोटेस्टमध्ये रोज नवे वळण मिळत आहे. विद्यार्थी त्यांच्या मागण्यांवरुन अडून बसले आहेत. अनेक स्तरातून या आंदोलनला पाठींबा देत आहेत. यात एका १३ वर्षांच्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा सहावीत शिकणारा विद्यार्थी जंतरमंतर वरील इरफान सारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निदर्शनात सामील होत या विद्यार्थी सरकारला थेट प्रश्न करत आहे. त्याचे इंग्रजीतील संभाषण ऐकून हैराण होत आहेत.

कोण आहे का मुलगा ?

13 वर्षांच्या या मुलाचे नाव जैन इकदिस हैदर आहे. हा सहावीत शिकत आहे. हा मुलगा रांचीचा राहणारा असल्याचे म्हटले जात आहे. या मुलगा निदर्शनात विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी आला आहे. व्हिडीओत त्याने म्हटले की मी येथे अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. जेव्हा मी फोन स्क्रॉल करतो तर मला जंतर-मंतरवर बसलेले विद्यार्थी दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांची पेपर लिकमुळे दोन-तीन वर्षे वाया गेली आहेत. त्यांना पाहून मला वाटले की मी देखील या आंदोलनाचा एक भाग व्हावे…

आम्हाला देखील पुढे जाऊन भविष्यात परीक्षा द्यावा लागणार आहेत. त्यामुळे आम्हाला भविष्यात कोणत्याही त्रासाचा सामना करावा लागू नये यामुळे या निदर्शनात भाग घेत आहेत.आम्ही तरुण देशाचे भविष्य आहे. देशाला पुढे नेत आहोत. आम्ही आपल्या सर्व इच्छांना मारुन सतत मेहनत करत आहोत. यानंतरही जर असेच पेपर फुटत असतील तर देश पुढे कसा जाईल असा सवाल या लहानग्या मुलाने केला आहे.

लोकांना का आवडतोय ?

असे म्हटले जात आहे की जंतर-मंतरवरील आंदोलक त्यांच्या वकृत्वामुळे व्हायरल झाले होते. तसाच हा १३ वर्षांचा मुलगा देखील व्हायरल झाला आहे. त्याच्या संभाषणातील स्पष्टता खूपच खास आहे. इंग्रजी देखील खूपच फ्ल्युएंट आहे. एवढ्या कमी वयात तो सरकारला ज्या प्रकारे धारेवर धरत आहे, ती पद्धत लोकांना आवडत आहे.

येथे पाहा पोस्ट –

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us