जोधपुरात साकारतेय भव्य अक्षरधाम मंदिर,येत्या २५ सप्टेंबर रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
राजस्थानच्या जोधपुरात BAPS संस्थेद्वारे भव्य अक्षरधाम मंदिराच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी या मंदिराची प्राण प्रतिष्ठा होत आहे.

जोधपुर येथील काली बेरी क्षेत्रातील BAPS स्वामीनारायण संस्थेद्वारे एका भव्य अक्षरधाम मंदिराची निर्मिती सुरु असून या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. या भव्य मंदिराचे काम जवळपास २४.७६ एकर जमीनीवर सुरु आहे.या संपूर्ण मंदिराची निर्मिती जोधपुरी लाल दगडांपासून सुरु आहे. त्यात अत्यंत कोरीव नक्षीकाम केलेले आहे. यातून प्राचीन सनातन संस्कृतीचे जतन होणार आहे. मंदिराच्या भिंती, स्तंभ आणि घुमटावरील कलाकृती अद्वितीय असून हे मंदिर मरुधाराच्या सांस्कृतिक वारशाला एक नवीन आयाम देणार आहे.

या मंदिरासह दिव्य प्रांगणाचा २५ सप्टेंबर २०२५ रोजी गुरुहरी महंत स्वामीजी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा महोत्सव होणार आहे.या निमित्ताने सायंकाळी मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे.या भव्य मंदिर महोत्सव सात दिवस विविध कार्यक्रमांच्या रुपाने साजरा केला जाणार आहे. याला परम पूज्य महंत स्वामी महाराजांची उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी भारतातूनच नाही तर जगभरातील विविध भागातून लाखो श्रद्धाळू येण्याची शक्यता आहे.

हे भव्य अक्षरधाम मंदिर केवळ जोधपुरच नाही तर संपूर्ण मारवाडमध्ये प्राचनी सनातन संस्कृतीचे ध्वजवाहक रुपाने प्रस्थापित होणार आहे. हे अक्षरधाम मंदिर येणाऱ्या पिढीसाठी अध्यात्म, संस्कृती आणि सेवेचे प्रेरणास्रोत बनून मरुभूमीत एक नवजीवनाचा संचार करणार आहे.
BAPS स्वामीनारायण संस्थेविषयी
BAPS स्वामीनारायण संस्था एक जागतिक आध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक संघटना असून त्याची स्थापना वैदीक सिद्धांताच्या आधारे १९०७ मध्ये झाली होती.सध्या परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था मानव कल्याण, सेवा, संस्कार आणि आध्यात्मिकतेचा संदेश देत आहे.या संस्थेद्वारा जगभरात भव्य मंदिर, संस्कार शिबिर, सेवा कार्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे संचालन केले जाते. जी भारतीय सनातन संस्कृतीचा प्रचार-प्रसाराचा आधार आहे.

Akshardham
