AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केदारनाथमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून 6 जण ठार! कोणत्या कंपनीचं होतं हेलिकॉक्टर?

हेलिकॉटरमधील 8 पैकी सहा जणांचा जागीच मृत्यू! नेमकं कशामुळे झाला हेलिकॉप्टरचा अपघात?

केदारनाथमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून 6 जण ठार! कोणत्या कंपनीचं होतं हेलिकॉक्टर?
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरImage Credit source: ANI
| Updated on: Oct 18, 2022 | 12:31 PM
Share

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : केदारनाथमध्ये मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना (Kedarnath Helicopter crash) घडली. सकाळच्या सुमारास एक खासगी हेलिकॉप्टर केदारनाथ जवळ कोसळलं. आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा जण हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी (6 killed in Helicopter crash) पडलेत. एकूण आठ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते, असं सांगितलं जातंय. उत्तराखंडच्या केदारनाथपासून (Uttarakhand, Kedarnath Crash) अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं.

आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये 8 भाविक होते. या भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जात असताना काळानं 6 प्रवाशांना घाला घातला. या  दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पाहा व्हिडीओ :

हेलिकॉप्टर दुर्घनटेचं कारण अस्पष्ट

हेलिकॉप्टर दुर्घटना झालेल्या ठिकाणी बचाव पथकही रवाना झालंय. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग भडकली होती. हेलिकॉप्टरचा अक्षरशः चुराडा झाल्याचे थरकाप उडवणारे फोटोही समोर आले आहेत. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे.

नेमका ही दुर्घटना कशामुळे घडली, याची उकल होऊ शकलेली नाही. खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, तज्ज्ञांकडून आता या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास केला जाणार आहे.

केदारनाथपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरूरचट्टी या गावात हेलिकॉप्टर कोसळलं. यानंतर एकच खळबळ उडाली. हेलिकॉप्टर दुर्घटनेवेळी काळजाचा थरकाप उडवणारा मोठा आवाज झाला होता. त्यामुळे आजूबाजूचे लोकही धास्तावले. डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.