AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! आज तुमच्या मोबाईलवर वाजू शकतो मोठा सायरन, घाबरू नका, नेमकी भानगड काय वाचा

दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण २ मे रोजी देशव्यापी आपत्ती सूचना प्रणालीची चाचणी घेणार आहेत. या चाचणीदरम्यान, देशभरातील लाखो मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरन वाजू शकतात. जर तुमच्या मोबाईलवर देखील सायरन वाजला तर घाबरु नका...

सावधान! आज तुमच्या मोबाईलवर वाजू शकतो मोठा सायरन, घाबरू नका, नेमकी भानगड काय वाचा
Mobile sirenImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 02, 2026 | 10:36 AM
Share

२ मे रोजी देशभरातील कोट्यवधी मोबाईलवर एकाच वेळी मोठा सायरन वाजू शकतो. सरकार देशभरात एक नवीन मोबाईल-आधारित ‘डिझास्टर अलर्ट सिस्टम’ (आपत्ती चेतावणी प्रणाली) तपासणार आहे. दूरसंचार विभागाने नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी (NDMA) च्या सोबतीने हे मोबाईल डिझास्टर कम्युनिकेशन सिस्टम किंवा इमर्जन्सी अलर्ट सिस्टम तयार केले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांना एकाच वेळी सतर्क करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

नेमकी काय आहे भानगड?

यापूर्वी देखील दिल्ली-NCR आणि अनेक मेट्रो शहरांमध्ये या प्रणालीची चाचणी घेण्यात आली आहे. सरकारने याला ‘सचेत’ (SACHET – नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टल) असे नाव दिले आहे. सरकारने एसएमएसद्वारे (SMS) याबाबतची माहिती आधीच लोकांपर्यंत पोहोचवली आहे. NDMA द्वारे पाठवण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, “२ मे २०२६ रोजी तुमच्या भागात ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट’ची चाचणी केली जाईल. तुमच्या मोबाईलवर हा संदेश आल्यास, कोणत्याही कृतीची आवश्यकता नाही. कृपया घाबरून जाऊ नका.”

अशा परिस्थितीत म्हणजेच 2 मे रोजी तुमच्या फोनवर सायरन वाजला, तर घाबरण्याची गरज नाही. भविष्यात कोणतीही आपत्ती आल्यास लोकांपर्यंत वेळीच माहिती पोहोचवता यावी, यासाठी सरकार या अलर्ट सिस्टमची चाचणी घेणार आहे. दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) मिळून ही चाचणी करत आहेत. हे आपत्तीच्या वेळी लोकांना सावध करण्याचे काम करेल, जेणेकरून लोक सतर्क राहतील आणि जीवित व वित्तहानी कमी करता येईल.

ही यंत्रणा कशी काम करते?

DoT आणि NDMA ने विकसित केलेली ही अलर्ट सिस्टम ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’ (CAP) वर आधारित आहे. इंटरनॅशनल टेलिकॉम युनियनने सुचवलेली ही प्रणाली देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय आहे. यामध्ये वापरकर्त्यांना मोबाईलवर एसएमएसद्वारे आपत्तीशी संबंधित चेतावणी पाठवली जाते. तसेच, फोनवर एक मोठा सायरन वाजवला जातो, जेणेकरून लोक सावध होतील.

विशेष म्हणजे, ही यंत्रणा अशा प्रकारे विकसित करण्यात आली आहे की, ज्या भागात आपत्ती येणार आहे केवळ त्याच भागातील लोकांच्या मोबाईलवर हा अलर्ट येईल. यामध्ये ‘सेल ब्रॉडकास्ट’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे सर्व मोबाईल उपकरणांवर एकाच वेळी (रियल टाइममध्ये) अलर्ट प्राप्त होतो.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी