आता तर हद्द झाली राव! महिलेने चक्क रेल्वे ट्रॅकवरूनच चालवली कार, मग झाले काय? तो Video तुफान व्हायरल

Telangana Shankarpally : तेलंगणातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका महिलेने येथे रेल्वे ट्रॅकवर बेधडक, बिनधास्त कार दामटली आहे. या घटनेमुळे बेंगळुरू-हैदराबाद रेल्वे मध्येच थांबवावी लागली.

आता तर हद्द झाली राव! महिलेने चक्क रेल्वे ट्रॅकवरूनच चालवली कार, मग झाले काय? तो Video तुफान व्हायरल
महिलेचा 'कार'नामा
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 12:19 PM

Lingampally to Vikarabad Junction : तेलंगणामध्ये एक महिलेच्या प्रतापामुळेबेंगळुरू-हैदराबाद रेल्वे मध्येच थांबवावी लागली. तिने रेल्वे ट्रॅकवरच कार दामटली. महिलेच्या या कारनामामुळे एकच खळबळ उडाली. अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झाला. या महिलेचा हा वेडेपणा तिच्यासह अनेकांच्या जीवावर बेतला असता. तेलंगणामधील शंकरपल्ली येथील ही घटना आहे. लिंगमपल्ली ते विकाराबाद जंक्शन दरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काय आहे तो व्हिडिओ

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला तिची कार रेल्वे ट्रॅकवर दामटताना दिसत आहे. ती वेगाने ही कार ट्रॅकवर पळवण्याचा प्रयत्न करत असताना या व्हिडिओ दिसते. तर या महिलेच्या कृतीने आजूबाजूचे लोक ओरडताना दिसत आहे. काही जण तात्काळ रेल्वे विभागाला माहिती देण्याची विनंती करत आहेत. पुढील अनर्थ टाळता यावा यासाठी लोकांनी तिची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ही महिला कुणाचेच काही ऐकण्याच्या मनस्थिती नसल्याचे दिसते. तिथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी पण धाव घेतल्याचे दिसते. ही तरुणी कुणाचेच काही ऐकत नसल्याचे व्हिडिओत दिसते. तिच्या या कृतीने एकच खळबळ उडाली. रेल्वे यंत्रणेतील फोन खणाणले. अनेक लांब पल्ल्याच्या आणि इतर रेल्वेच्या दळणवळणावर थेट परिणाम झाला. तात्काळ याविषयीची माहिती स्थानिक जंक्शनमध्ये दिल्याने पुढील अनर्थ टळला. या मार्गावरील रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या.

ट्रेन थांबवावी लागली

एक महिला वेगाने रेल्वे रुळावर कार दामटत असल्याची माहिती रेल्वे विभागाला मिळताच, कर्मचाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. या मार्गावर मार्गस्थ होत असलेली बेंगळुरू-हैदराबाद रेल्वे मधातच थांबवावी लागली. इतर रेल्वेच्या वेळापत्रकावर पण परिणाम झाला. या ट्रेन आता उशीरा धावत आहेत. या प्रकरणी रेल्वे आणि स्थानिक पोलिासांनी तपास सुरू केला आहे. ही महिला कोण आहे, तिने ही कृती मुद्दामहून केली की तिची मानसिक स्थिती चांगली नाही हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे. या घटनेमागे घातपाताचा प्रकार तर नाही ना, याचाही पोलीस शोध घेत आहेत.