AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई-मुलाच्या डोक्यावर धरले पिस्तूल, पुण्यात सराईत गुंडांचा पुन्हा हैदोस; १४ वाहनांची तोडफोड

Pune News : पुण्यातील सिंहगडच्या रोडवरच्या खानापूर येथे सराईत गुंडांनी गावठी पिस्तूल, कोयते घेऊन हैदोस घातला. त्यांनी या भागात १४ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे.

आई-मुलाच्या डोक्यावर धरले पिस्तूल, पुण्यात सराईत गुंडांचा पुन्हा हैदोस; १४ वाहनांची तोडफोड
पुण्यात गुंडांचा पुन्हा हैदोस Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 11:30 AM
Share

पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याच्या दाट लोकवस्तीच्या खानापूर येथे सराईत गुंडांनी हातात दोन गावठी पिस्तूल आणि कोयते घेऊन हैदोस घातला. रिक्षा, कार , टेम्पो, मोटरसायकल आदी १४- १५ वाहनांची तोडफोड केली. प्रसाद महादेव जावळकर याच्या घरात शिरुन आई भारती जावळकर आणि प्रसाद यांच्या डोक्यावर पिस्तूल धरले आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली तसेच घरातील टीव्ही आणि इतर मालमत्तेचे नुकसान केले. हा प्रकार काल मंगळवारी (२४) रोजी रात्री साडे नऊ आणि बुधवारी (२५) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

या घटनेने खानापूर गावांसह सिंहगड पानशेत भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारीनंतर हवेली पोलिसांनी प्रणव उर्फ चिक्या रणधीर, तन्मय उर्फ पिनुड्या तानाजी धीवार, अथर्व उर्फ झिंग्या दिलीप गायकवाड, आयुष उर्फ लाल्या प्रविण सोनवणे, आदित्य पोपट जाधव (सर्व राहणार खानापुर, ता. हवेली ) यांच्यासह १५ जणांविरोधात भादंवि १०९, ३३३ आदी कलमाखाली सशस्त्र प्राणघातक हल्ला, बेकायदा जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान, दहशत माजवणे असा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून शोध मोहिम

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, किरकोळ कारणावरून सराईत गुंडानी घरावर तसेच गावातील वाहनांवर हल्ला करून तोडफोड केली. तसेच गावठी पिस्तूल , कोयते अशी प्राणघातक शस्त्रे घेऊन हैदोस घातला या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक शितल टेंबे, पोलिस अंमलदार संतोष तोडकर , संतोष भापकर यांचे पथक तपास करत आहेत.

या बाबत हवेली पोलीसांनी सांगितले की, खानापूर गावातील दिलशान अली यांच्या सलून दुकानाच प्रसाद जावळकर याने माझा मित्र विकास सोपान जावळकर याला तुझ्या सोबत यायचे नसताना त्याला तू जबरदस्ती का करतो असा जाब हल्लेखोर प्रणव रणधीर याला जाब विचारला. त्यावेळी मानव पोपट जाधव याने विकास जावळकर याला जिवे मारण्याची धमकी दिली . नंतर प्रणय रणधीर आणि त्याच्या साथीदारांनी प्रसाद, विकास जावळकर आणि रोहित राजू जावळकर यांना शिवीगाळ करत दमदाटी दिली . त्यावेळी प्रणव रणधीर याने तन्मय धिवार याच्या कमरेचे गावठी पिस्तुल हातात घेतेले आणि गोळी मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रसंगधावतेने प्रसाद जावळकर हा तिथून पळून गेला. नंतर त्याने हवेली पोलीस ठाण्यात प्रणव रणधीर त्याच्या साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली.

प्रसाद हा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्याने चिडून जाऊन प्रणव रणवीर आणि त्याच्या साथीदारांनी नंतर आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास प्रसाद जावळकर याच्या घरात शिरुन जोरदार हल्ला केला. त्यात घरातील टीव्हीसह प्रापंचिक मालमत्तेचे ‌तोडफोड करत नुकसान केले.

त्यावेळी प्रसाद याची आई भारती जावळकर ही साहित्य वाचवण्यासाठी पुढे गेली असता तिच्या डोळ्यावर पिस्तूल धरत प्रणव रणधीर याने तुझ्या मुलाने पोलीसांत आमच्या विरोधात तक्रार दिली तर तुमच्या सर्व घरादाराला जिवे ठार मारू अशी धमकी दिली. जोरदार आरडाओरडा ऐकून गावातील प्रसाद याच्या घरासमोर जमाव जमला. त्यावेळी हातात पिस्तूल, कोयते घेऊन हल्लेखोरांनी घरासमोर उभ्या असलेल्या गाड्याची तसेच भैरवनाथ मंदिर आणि सरकारी दवाखान्याजवळील वाहनांची तोडफोड करत मध्यरात्री पासून पहाटे पर्यंत दहशत निर्माण केली. आमच्या नादाला कोण लागले तर त्याला जिवे ठार मारू अशी धमकी देत हल्लेखोर पसार झाले.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.