मोठी बातमी! दिल्लीमध्ये भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न? केजरीवालांचा सर्वात विश्वासून नेता बनणार उपमुख्यमंत्री?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीमध्ये आपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भाजपनं जोरदार मुसंडी मारली

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीमध्ये आपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भाजपनं जोरदार मुसंडी मारली, तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली आहे. हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. कारण आपच्या अभेद्य गडाला भाजपनं सुरुंग लावला आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांना आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे.
शनिवारी दिल्ली विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये आपचा पराभव झाला आणि भाजप सत्तेत आली. त्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? मात्र मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्रिपदाची देखील चर्चा सुरू झाली आहे. जे नाव समोर येत आहे, त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अशी चर्चा सुरू आहे, की भाजपला दिल्लीमध्ये केवळ सत्ताच स्थापन करायची नाहीये तर केजरीवाल यांचं आव्हान कायमस्वरुपी मोडून काढायचं आहे. त्यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. भाजपनं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत घेऊन उद्धव ठाकरेंना सत्तेपासून दूर ठेवलं होतं. तसाच डाव आता दिल्लीमध्ये देखील खेळला जाण्याची शक्यता आहे.
भाजपकडून दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाऊ शकतो. त्यासाठी पक्षाकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आतिशी यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपचे आर्धे आमदार आतिशी या भाजपसोबत आणू शकतात.
भाजपकडून आतिशी यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळू शकते अशी माहिती आता समोर येत आहे. जर आतिशी भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्या तर आपचे अर्ध्याहून अधिक आमदार त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यापूर्वी महाराष्ट्रात भाजपनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली. त्यानंतर मध्यप्रदेशात देखील हाच पॅटर्न राबवण्यात आला. आता दिल्लीमध्ये असाच पॅटर्न राबवणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.