
Aap Shambhu Mandir in jammu: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेश सिंदूर’ राबवत पाकिस्तावर हल्ला केला. अशात बिधरलेल्या पाकिस्तानने देखील गोळीबार आणि हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने आप शंभू मंदिरावर देखील हल्ला केला. पाकिस्तानने डागलेलं मिसाईल मंदिराच्या गेटजवळ पडलं. भगवान शिव यांना समर्पित असलेल्या या मंदिरावर लोकांची खूप श्रद्धा आहे. शंभू मंदिर जम्मूतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या काळात मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.
जम्मूला मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. जम्मूपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या रूप नगरमध्ये शंकराचं मंदिर आहे. हे फक्त एक मंदिरच नाही तर त्याला एक मोठा पौराणिक इतिहास आहे. मंदिराचे पुजारी आणि स्थानिक लोकं सांगतात की, शुक्ल पक्षात मंदिरात असलेलं शिवलिंग तपकिरी रंगाचं दिसतं. तर, कृष्ण पक्षात शिवलिंगाचा रंग गडद तपकिरी होतो.
पौराणिक केथेनुसार, पूर्वी मंदिराच्या भोवती घनदाट जंगल होतं. तेव्हा कोणीतरी गुज्जर व्यक्ती आपली गुरे चरण्यासाठी जंगलात आणत असे. गुरांमध्ये एक गाय देखील होती. जी चांगल्या प्रमाणात दूध द्यायची पण गायीचं दूध कधीच गुज्जरच्या कुटुंबियांना मिळायचं नाही. अशात त्रासलेला गुज्जर सतत विचार करायचा की गाय देत असलेलं दूध जातं तरी कुठे?
जंगलात चरायला गेल्यानंतर गाय अचानक गायब व्हायची आणि दोन – तीन तसांनी परत यायची. अशात एक दिवस गुज्जरने ठरवलं की, गायीच्या पाठी जायचं. गुज्जर गायीच्या पाठीपाठी गेला. गाय थांबली तेथून थोडं लांब गुज्जर देखील थांबला आणि त्याने पाहिलं दुधाचा प्रवाह स्वतःहून वाहत आहे.
गुज्जरने जवळ जावून पाहिलं तर, तेथे एक दगड होतं. गुज्जरला राग आला आणि त्याने कुऱ्हाडीने दगडावर इतका जोरात प्रहार केला की त्याचे दोन तुकडे झाले आणि त्यातून रक्त येऊ लागलं. हे सर्व पाहून गुज्जरने जवळच्या लोकांना माहिती दिली.
असं म्हणतात, वरील घटना लोकांना माहिती झाल्यानंतर, गुज्जरने भगवान शिव यांची क्षमा मागितली, त्यानंतर या मंदिराला शंभू मंदिर असे नाव पडलं. आता पाकिस्तान आणि भारतात सुरु असलेल्या तणावादरम्यान मंदिराचं रहस्य समोर आलं.