AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: आता तुझी पाळी आहे, तयारीत राहा…अभिजीत दिपके यांनी कोणाला दिली वॉर्निंग?

Abhijeet Dipke CJP: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनले आहे. आधी आंदोलन आणि आता त्यांची सुरु असेलली मोहिम यामुळे आता अभिजीत दिपके पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.

Abhijeet Dipke: आता तुझी पाळी आहे, तयारीत राहा...अभिजीत दिपके यांनी कोणाला दिली वॉर्निंग?
| Updated on: Aug 27, 2026 | 1:16 PM
Share

Abhijeet Dipke CJP: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनले आहे. आधी आंदोलन आणि आता त्यांची सुरु असेलली मोहिम यामुळे आता अभिजीत दिपके पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत. अभिजीत दिपके सध्या स्कूल ठिक करो या मोहिमेवर आहे. या मोहिमेअंतगर्त ते जिल्हा परिषदेच्या शाळेत जे विद्यार्थी शिकतात त्यांना उदभवणाऱ्या समस्येवर काम करत आहे. आता नुकतीच अभिजीत दिपके यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीची सध्या चर्चा सुरु आहे.

अभिजीत दिपके यांनी त्याच्या मित्र सौरव दासबद्दल एक किस्सा सांगितला आहे. न्यूज24 ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दीपके म्हणाले की, मार खाऊनही आम्ही पुन्हा उभारी घेणारे लोक आहोत. मला मारहाण झाली, त्याला (आशुतोष रांका) मारहाण झाली आणि आता फक्त सौरव उरला आहे. सौरव तुझी पण वेळ येणार आहे.” दिपके हे जरी गंमतीत बोलला असला तरीही त्याने सौरवला थेट इशारा दिला आहे.

या वर्षी जूनमध्ये राजस्थानमधील जयपूर येथे एका आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला झाला होता. जयपूरमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करण्यासाठी जात असताना दीपे यांच्या एका समर्थकाने त्यांना खांद्यावर उचलले. यावेळी जमावातील काही लोकांनी त्यांना कानाखाली मारली आणि खाली खेचण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

दीपके यांनी आरोप केला आहे की, या हल्ल्यामागे आरएसएसशी संबंधित काही लोक होते. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रयत्न होता. गेल्या आठवड्यात राजस्थानमध्ये सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि काही कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. जयपूरच्या बागरू विधानसभा मतदारसंघातील एका सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी जात असताना रांका आणि सीजेपी कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. रांका यांनी सांगितले की, “या हल्ल्यात एका सीजेपी कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाला. या घटनेत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा” आरोप रांका यांनी केला.

Follow Us
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी