AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC पेपरफुटीवरून राजकारण पेटलं; भाजप नेत्याचं थेट रोहित पवारांना ओपन चॅलेंज, म्हणाले, ‘हिंमत असेल तर….’

MPSC पेपरफुटीवरून राजकारण पेटलं आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्याने थेट रोहित पवारांना ओपन चॅलेंज दिलं आहे. आता या प्रकरणावर रोहित पवारांनी बोलावं, असं त्यांनी म्हटलं.

MPSC पेपरफुटीवरून राजकारण पेटलं; भाजप नेत्याचं थेट रोहित पवारांना ओपन चॅलेंज, म्हणाले, 'हिंमत असेल तर....'
navnath ban on rohit pawar Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 1:11 PM
Share

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. त्यात सुनील गाढवे याचाही समावेश आहे. सुनील गाढवे याने स्वत:च्या पत्नीसाठी पेपर फोडला आहे. त्यामुळे एमएसीएससी अध्यक्ष, सचिवांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मेहमबूब शेख यांनी केली. गाढवे हे अभिमन्यू याचे पीए असल्याचाही अप्रत्यक्ष आरोप मेहबूब शेख यांनी केला. मेहबूब शेख यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला. आरोपी गाढवे हा रोहित पवारांचा उजवा हात असल्याचा आरोप बन यांनी केला.

भाजप नेते नवनाथ बन यांनी म्हटलं की, ‘सरकार कुठेही हातावर हात धरून नाही. आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली आहे. त्यात एमपीएससीचा अधिकारी आहे. त्यालाही अटक केली आहे. सरकार आमचं आहे. कारवाई देखील आम्हीच करत आहे. आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. यात राजकारण रोहित पवार करत आहे. रोहित पवारांनी बेगडी राजकारण करत आहेत. तुम्ही सुनील गाढवेंविषयी प्रश्न विचारत आहे. परंतु गाढवे तुमचा उजवा हात आहे. त्याच्यावर खुलासा करा. सरकार आमचं असून कारवाई करत आहोत. आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत’.

सरकार कोणत्याही दोषीला सोडणार नाही – बन 

‘सरकारने कोणत्याही दोषीला सोडलं नाही. जे दोषी असतील, त्यात क्लासचा चालक असेल किंवा अन्य कोणी असेल. या सर्वांना अटक करून चौकशी केली जाते. यात आणखी कोणाचा संबंध असेल, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. परंतु सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचं नातं काय आहे, संबंध नेमके काय आहेत, तुमचा उजवा हात म्हणून कधीपासून काम करत आहे. याचं उत्तर रोहित पवार देणार आहे का? आरोपीविषयी रोहित पवार काही बोलणार आहेत का? रोहित पवारांनी बोलायला हवं, असं चॅलेंज बन यांनी रोहित पवारांना दिलं.

आता रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलावं – नवनाथ बन 

‘सुनील गाढवेचा भाजपशी कोणताही संबंध नाही. माझं अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणे झालं. त्यांनी गाढवेशी कोणतेही संबंध असल्याचे फेटाळून लावले आहे. गाढवे कधीच अभिमन्यू पवार यांचे पीए नव्हते. अभिमन्यू पवार हे एमपीएससी विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सरकार दरबारी शिष्टमंडळाला घेऊन भेटले होते. त्यात गाढवे होता. परंतु गावढे याने अभिमन्य पवार यांचे पीए म्हणून कोणतंही काम कधी केलं नाही. गाढवे हा रोहित पवारांचा उजवा हात असून त्यांनी आता बोललं पाहिजे. रोहित पवारांनी मेहबूब शेख यांना पुढे करण्यासाठी रोहित पवारांनी पुढे यावे. ते रोज पत्रकार परिषद घेतात. आता मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका रोहित पवारांनी का घेतली? मेहबूब शेख यांना पुढे का घेतलं, त्यांच्यामध्ये दम असेल, तर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडावी, असे बन पुढे म्हणाले.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक