AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात येताच अभिजीत दीपकेंची आंदोलनाबाबत मोठी घोषणा, प्लॅन केला जाहीर!

आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या मार्गाने चालणारे आहोत. नरेंद्र मोदी हे हुकूमशाह आहेत. या हुकूमशाहाची हुकूमशाही संपवावीच लागणार आहे, असा हल्लाबोल अभिजीत दीपके यांनी केला.

महाराष्ट्रात येताच अभिजीत दीपकेंची आंदोलनाबाबत मोठी घोषणा, प्लॅन केला जाहीर!
abhijeet dipke and delhi cjp protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 6:22 PM
Share

Abhijeet Dipke : अभिजीत दीपके सध्या महाराष्ट्रात परतले आहेत. त्यांच्या आजीचे निधन झाल्याने ते दिल्लीतून महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रात परतताच दीपके यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी काहीही झाले तरी आंदोलन थांबणार नाही, अशी महत्त्वाची भूमिका घेतली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत, अशी टीका केलीय. तसेच आम्ही शांत बसणार नाहीत. आम्ही घाबरणार नाहीत, असा निश्चच त्यांनी बोलून दाखवला.

प्रत्येकालाच रस्त्यावर उतरून लढावे लागणार

मुंबईत माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधू तेजस ठाकरे हे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मुंबईत शिवसेना भवनाच्या समोर शिवसैनिक आणि मुंबई पोलीस एकमेकांच्या समोर आल्याचे दिसले. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली. दुसरीकडे काहीही झालं तरी माघार घेणारच नाही, असा निश्चय आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला. यावरही दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकालाच रस्त्यावर उतरून लढावे लागणार आहे. एकट्या ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीमध्ये आणीबाणी लादली. मेट्रो, बसेस सगळं बंद केलं. यांना आता घालवावेच लागेल, असा हल्लाबोल दीपके यांनी केला.

आम्ही काय दहशतवादी आहोत का?

आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या मार्गाने चालणारे आहोत. नरेंद्र मोदी हे हुकूमशाह आहेत. या हुकूमशाहाची हुकूमशाही संपवावीच लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी बंद करून टाकलं. भारतात कधीही विमानातूनच अटक केलेली नाही. आम्ही काय दहशतवादी आहोत का? असा बोचरा सवालही दीपके यांनी केला.

दिल्ली पोलीस अशा प्रकारे खून करायला…

त्यांनी अख्खा देश अडाणी यांना विकलाय. पोलीस तरुणांना मारत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने पोलिसांना मुलांचा खूनही करावा लागेल. दिल्ली पोलीस अशा प्रकारे खून करायला तयार आहेत का? असा तिखट सवाल दीपके यांनी केला. जेव्हा देश गुंड चालवतात तेव्हा गुंडांचेच प्रमोशन होते, असेही दीपके म्हणाले.

त्यांना वाटले मी घाबरेल, पण मी….

दरम्यान, दीपके यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरूच राहील. आम्ही माघार घेणार नाही. मला बेकायदेशीरित्या ताब्यात घेण्यात आले. त्यांना वाटले मी घाबरेल. पण मी घाबरणार नाही. मोदी यांच्यासारखे हुकूमशाहा येतील आणि जातील. पण देश असाच राहणार आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ