मोदीजी… तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, अभिजीत दिपकेंचा थेट इशारा; देशाचे लक्ष जंतरमंतरकडे

Abhijeet Dipke on PM Modi : अभिजीत दिपके हे गेल्या काही काळापासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून दिपके यांनी पंतप्रधान मोदींना इशारा दिला आहे.

मोदीजी... तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, अभिजीत दिपकेंचा थेट इशारा; देशाचे लक्ष जंतरमंतरकडे
Abhijeet Dipke on PM Modi
Image Credit source: Google
| Updated on: Jul 23, 2026 | 7:53 PM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे गेल्या काही काळापासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी दिपके यांची मागणी आहे. आता दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. दिपके यांनी म्हटले की, ‘जर तसे झाले नाही, तर आंदोलन केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरते मर्यादित राहणार नाही, तर पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येईल.’ अभिजीत दीपके यांच्या या आवाहनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष जंतर मंतरकडे

अभिजीत दिपके यांच्या या विधानानंतर संपू्र्ण देशाचे लक्ष आता जंतर मंतरकडे लागले आहे. दिपके यांचे हे विधान सीजेपीने 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर समोर आले आहे. त्यामुळे आता आगामी काळात दिपके यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे संकेत दिले आहेत. आता उद्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

“…तर तुम्हाला कोणीही मत देणार नाही” – अभिजीत दिपके

गुरूवारी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ‘एक अयोग्य आणि अपयशी मंत्री या देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांपेक्षा मोठा असू शकत नाही. जर सरकार कोट्यवधी विद्यार्थ्यांपेक्षा एका अपयशी मंत्र्याला अधिक महत्त्व देत असेल, तर लक्षात ठेवा, निवडणुकीत भारतातील कोणताही विद्यार्थी आणि युवक तुम्हाला मत देणार नाही. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत नाही आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांबाबत जबाबदारी निश्चित केली पाहिजे.

24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन

सीजेपीने 24 जुलै (शुक्रवार) रोजी होणाऱ्या आंदोलनाची माहिती पॅम्प्लेटद्वारे शेअर केली आहे. हे पत्रक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पक्षाने नागरिकांना मोठ्या संख्येने शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होऊन एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. संघटनेने प्रत्येक जिल्ह्यात एक दिवसासाठी शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन करत केले आहे. या पोस्टरमध्ये Every District. One Day. One Demand. असा संदेश देण्यात आला आहे.

सीजेपीने आंदोलनादरम्यान उपस्थित नागरिकांसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्या सार्वजनिकपणे वाचून दाखवण्याचे तसेच पोलिस कारवाईचा सामना करणाऱ्यांशी एकजूट व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आंदोलनाशी संबंधित स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर, प्रचार साहित्य आणि निवेदनाचा नमुना सीजेपीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Follow Us