AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं

भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात विजय मिळवला. खरं तर कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हा विजय खूपच महत्त्वाचा होता. कारण आतापर्यंत त्याच्या नेतृत्वात फक्त आणि पराभव पाहायला मिळाला.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलंImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 23, 2026 | 7:45 PM
Share

टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात झिम्बाब्वे विजयासाठी 126 धावांचं छोटसं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे विजय होईल हे निश्चित होतं. पण मागच्या काही सामन्यातील अनुभव पाहता मनात शंकाही होती. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. पण भारतीय गोलंदाज फलंदाजांनी यावेळी आपलं कौशल्य दाखवलं आणि विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने नेतृत्व हाती घेतल्यापासून नाणेफेक जिंकण्याचा सपाटा लावला आहे. पण विजय काही मिळत नव्हता. अखेर 7 सामन्यानंतर आठव्या सामन्यात टीम इंडियाला विजयाची चव चाखता आली. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरने सुटकेचा श्वास सोडला असेल. वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीमुळे निम्मा सामना हातात पावरप्लेमध्येच आला होता. वैभवच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारताने पावरप्लेच्या 6 षटकात 66 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेलं 126 धावांचं आव्हान भारताने 3 गडी गमवून पूर्ण केलं.  भारताने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारताची फलंदाजी

झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने चांगली सुरूवात करून दिली. पण अभिषेक शर्माची साथ काही वैभवला लाभली नाही. अभिषेक शर्मा या सामन्यात फेल गेला. त्याने 8 चेंडूंचा सामना केला आणि अवघी एक धाव करून तंबूत परतला. पण दुसऱ्या बाजूला असलेल्या वैभव सूर्यवंशीने ही उणीव भरून काढली. त्याने 19 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार मारून 263च्या स्ट्राईक रेटने 50 धावा करून बाद झाला. त्याच्या अर्धशतकामुळे भारताचा विजय सोपा झाला होता. इशान किशनला देखील या सामन्यात सूर गवसल्याचं दिसून आलं. विजयाच्या तोंडावर असताना इशान किशन 35 धावा करून बाद झाला.

भारताची गोलंदाजी

भारताकडून मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी भेदक गोलंदाजी केली. त्याच्या अचूक टप्प्याच्या माऱ्यामुळे भारताने झिम्बाब्वेला 125 धावांवर रोखलं. मयंक यादवने 4 षटकात 18 धावा देत 2 गडी बाद केले. तर प्रिन्स यादवने 4 षटकात 19 धावा देत 2 विकेट काढल्या. शिवम दुबेने 4 षटकात 32 धावा दिल्या आणि एक विकेट काढण्यात यश मिळालं. तर फिरकीपटू रवि बिष्णोई याने 4 षटकात 6 च्या धावगतीने 24 धावा देत एक गडी बाद केला.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ