AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे ते जेंनझी त्यांच्या आई वडिलांचे ऐकत नाहीत ते तुमचे काय.. अभिजीत दिपकेचा सरकारला इशारा..

अभिजीत दिपके यांचे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच सरकारला मोठा इशारा देण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अभिजीत दिपके यांनी मोठे विधान केले.

अरे ते जेंनझी त्यांच्या आई वडिलांचे ऐकत नाहीत ते तुमचे काय.. अभिजीत दिपकेचा सरकारला इशारा..
Abhijit Dipke and Narendra Modi
| Updated on: Jul 25, 2026 | 2:10 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सातत्याने सांगितले जातंय. आंदोलन अधिक आक्रमक झाले आहेत. यादरम्यानच अत्यंत मोठी धमकी नुकताच देण्यात आली. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. हेच नाही तर पंतप्रधानांनाही राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. पुन्हा एकदा चहाचा स्टॉल लावावा लागेल, असे त्यांनी म्हटले. राघव चड्ढा याला समोसाचे दुकान त्याबाजूलाच लावण्याची वेळ येईल, असे मोठे विधान अभिजीत दिपकेने केले. कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्ली पोलिसांवर अभिजीत दिपके याने निशाणा साधला. विद्यार्थ्यांना पोलिसांनी त्रास देणे थांबवावे नाही तर आम्हाला पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करावे लागेल असेही अभिजीत दिपकेने म्हटले.

अभिजीत दिपके यांनी म्हटले की, हे जेंनझी कोणाचेही ऐकत नाहीत. ते त्यांच्या आई वडिलांचेही ऐकत नाहीत ते तुमचे काय ऐकणार? जेंनझी कोणत्याही व्यवस्थेला घाबरत नाहीत, ते कोणाचे ऐकत नाहीत, फक्त त्यांचे ऐकले जाते. त्यांना बोलायची सवय आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल नाही तर पंतप्रधानांना राजीनामा द्यायला लावू असे अभिजीत दिपकेने म्हटले.

जेवढे लोक तुम्ही जेलमध्ये टाकाल तेवढे जास्त आंदोलनात येतील. 20 तारखेला तुम्ही जे काही विद्यार्थ्यांसोबत केले त्यानंतर तुम्ही लोकांना लाजून मेले पाहिजे. तुमच्या लेकरांनाही तुमचा चेहरा बघायला आवडणार नाही. जेंव्हा तुम्ही तुमच्या घरी जात असाल तर त्यावेळी तुमचे लेकरं म्हणत असतील की, लेकरांना मारणारा गुंड आला.

दिल्ली पोलिसांमुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे, असेही अभिजीत दिपकेने म्हटले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची संख्या अधिक वाढत आहे. देशभरात मोर्चे काढली जात आहेत. मुंबईमध्येही मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी आंदोलने करताना दिसत आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच