New Year 2026 : थर्टी फर्स्टच्या रात्री ‘या’ डिशला होती मोठी मागणी… असंख्य ऑर्डर… अक्षरशः थकलेले डिलिव्हरी बॉय

New Year 2026 : थर्टी फर्स्टच्या रात्री लाखो लोकांच्या घरी 'ही' एक डिश पोहचवताना अक्षरशः थकलेले डिलिव्हरी बॉय... वर्षांच्या शेवटच्या रात्री लोकांना मारला 'या' चविष्ट पदार्थावर ताव..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'त्या' एका डिशची चर्चा...

New Year 2026 :  थर्टी फर्स्टच्या रात्री या डिशला होती मोठी मागणी... असंख्य ऑर्डर... अक्षरशः थकलेले डिलिव्हरी बॉय
| Updated on: Jan 02, 2026 | 9:30 AM

New Year 2026 : अनेकांना वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि आनंदात केली… अनेकांनी हॉटेल आणि कुठे बाहेर जाण्या ऐवजी घरात राहून मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत पार्टी केली. दरम्यान, असं सांगण्यात आलं की, नव्या वर्षी ऑनलाईन डिलिव्हरी बंद राहणार, पण असं काहीही झालं नाही. उलट थर्टी फर्स्टच्या रात्री डिलिव्हरी बॉयस यांनी त्यांची भूमिका चोख पार पाडली… आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप स्विगीने त्यांच्या लाईव्ह अपडेट्समध्ये 31 डिसेंबरच्या संध्याकाळी लोकांचा सर्वात आवडता पदार्थ कोणता होता हे सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षाच्या शेवटच्या रात्री लोकांनी घरी बसून अनेक पदार्थ ऑर्डर केले… पण सर्व पदार्थांमध्ये एका पदार्थाला लोकांनी सर्वांत जास्त पसंती दर्शवली… अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, तो पदार्थ कोणता होता, ज्याला लाखो लोकांनी एकाच रात्री ऑर्डर केलं. तर तो पदार्थ दुसरा तिसरा कोणता नसून बिर्याणी होता…

स्विगीने दिलेल्या अपडेटनुसार, संध्याकाळी 7.30 पर्यंत 2 लाख 18 हजार 993 प्लेट बिर्याणीची ऑर्डर मिळाली होती आणि प्रत्येक ऑर्डर वेळेत पोहोचवण्यात देखील आली. ज्यामुळे लोकांनी नववर्षाचं स्वागत मोठ्या आनंदात केलं. तर स्विगीने विनोदी अंदाजात सांगितलं की, ‘अद्याप 7.30 देखील वाजले नाहीत आणि 2 लाख 18 हजार 993 प्लेट बिर्याणीची ऑर्डर आली आहे.’

बिर्याणी यावेळी सर्वात टॉपला होती. रात्र होत होती तशा ऑर्डर देखील वाढत होत्या. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, रात्री 9.30 पर्यंत सर्वांत जास्त ऑर्डर आल्या होत्या. बेंगळुरूमध्ये, 1 हजार 927 लोकांनी सॅलड ऑर्डर केले, तर 9 हजार 410 लोकांनी खिचडी निवडली. उपमाही मागे नव्हता, 4 हजार 244 प्लेट्स ऑर्डर केल्या. जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड हवं म्हणून, गाजर हलवा अव्वल स्थानी होता, सुमारे 7 हजार 573 गाजर हलवा प्लेट्सच्या ऑर्डर होत्या.

रात्रभर झाली डिलिव्हरी…

आकडे पाहून डिलिव्हरी करणाऱ्या मुलांनी किती मेहनत घेतली असेल… हे तुमच्या देखील लक्षात आलंच असेल… ही मुलं रात्रभर त्यांच्या बाईकवरून डिलिव्हरी करत होते… संपूर्ण जग नव्या वर्षांचं आनंदाने स्वागत करत असताना या मुलांनी पदार्थ त्यांच्या घरी पोहोचवून त्यांच्या आनंद द्विगुनित केला…
स्विगीने असं देखील सांगितलं आहे की, 2025 या वर्षात अनेकांनी 6 कोटी 67 लाखांपेक्षा अधिक वेळा लोकांनी दुसऱ्यासाठी पदार्थ ऑर्डर केले आणि आता तर हे अत्यंत सामान्य झालं आहे. घरी आनंद साजरा करणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि तुमचे आवडते पदार्थ ऑर्डर करणं – हा नवीन ट्रेंड झाला आहे…