20 गर्लफ्रेंड, 2 पत्नी, दहा महिलांसोबत शारीरिक संबंध; मित्र खाकी वर्दी घरात विसरला अन् नौशादचं हादरवणारं कांड
तो कधी राहुल बनायचा कधी रिक्की, तर कधी नौशाद आपण एसओजी काँस्टेबल असल्याची ओळख देखील तो महिलांना सांगायचा, प्रकरण समोर येताच पोलिसांना प्रचंड धक्क बसला आहे.

तो कधी राहुल बनायचा कधी रिक्की, तर कधी नौशाद आपण एसओजी काँस्टेबल असल्याची ओळख देखील तो महिलांना सांगायचा.तो महिला कोणत्या धर्माची आहे, ते पाहून आपला धर्म आणि नाव देखील बदलायचा. महिला जर हिंदू असेल तर तो आपली ओळख राहुल आणि रिक्की अशी करून द्यायचा. जर महिला मुस्लिम असेल तर तो आपली ओळख नौशाद सांगायचा. एवढंच नाही तर या व्यक्तीची आधीच दोन लग्न झाली होती. त्यानंतर या व्यक्तीनं जे कांड केलं आहे, त्यामुळे पोलीस देखील हादरून गेले आहेत, जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या संभलमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे, नौशाद असं या व्यक्तीचं नाव आहे. नौशाद हा संभलमध्ये आपल्या एका मित्राच्या घरी राहण्यासाठी आला होता. त्याचा मित्र पोलीस काँस्टेबल आहे. त्यानंतर काही दिवसांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी त्याच्या मित्राची नियुक्ती मध्य प्रदेशमध्ये करण्यात आली. त्यामुळे त्याला उत्तर प्रदेशमधून मध्य प्रदेशला जावं लागलं. मात्र खकी वर्दीसह त्याच्या मित्राची बँग चुकून घरीच विसरली आणि ती नौशादच्या हाती लागली, आणि इथूनच नौशादच्या खेळाला सुरुवात झाली.
तो आपली वर्दी घेऊन मुझफ्फरनगरमध्ये आला. मुझफ्फरनगरमध्ये येताच त्याने आपले कारनामे सुरू केले. तो आपल्या मित्राची वर्दी घालत होता, आणि आपण एसओजी काँस्टेबल आहोत, अशी ओळख तो लोकांना करून द्यायाचा. त्याचे दोन लग्न झाले होते. त्याची पहिली बायको त्याच्यापेक्षा 23 वर्षांनी मोठी होती. नौशादनं या वर्दीचा फायदा घेऊन महिलांची फसवणूक सुरू केली.
20 गर्लफ्रेंड दहा महिलांसोबत शारीरिक संबंध
नौशाद अशा महिलांना गळाला लावायचा ज्या महिला विधवा आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे. अशा महिलांना तो आपण पोलीस असल्याचं सांगायचा. त्याचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. त्याने दहा महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असून, त्याच्या वीस गर्लफ्रेंड असल्याची माहिती समोर आली आहे.
