INS विराटवर राजीव गांधींसोबत हजर असलेले अॅडमिरल एल. रामदास काय म्हणाले?

INS विराटवर राजीव गांधींसोबत हजर असलेले अॅडमिरल एल. रामदास काय म्हणाले?

रायगड : ‘INS विराट’ या ऐतिहासिक युद्धनौकेचा वापर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सहलीसाठी केला, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा पूर्णपणे खोटा असून, त्यात काहीही तथ्य नाही, असे निवृत्त अॅडमिरल एल. रामदास यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची पोलखोलच माजी अॅडमिरल एल. रामदास यांनी केली आहे. कारण मोदींनी ज्या प्रसंगाचा उल्लेख राजीव […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 3:46 PM

रायगड : ‘INS विराट’ या ऐतिहासिक युद्धनौकेचा वापर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सहलीसाठी केला, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा पूर्णपणे खोटा असून, त्यात काहीही तथ्य नाही, असे निवृत्त अॅडमिरल एल. रामदास यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची पोलखोलच माजी अॅडमिरल एल. रामदास यांनी केली आहे. कारण मोदींनी ज्या प्रसंगाचा उल्लेख राजीव गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी केला आहे, त्यावेळी INS विराटवर राजीव गांधींसोबत अॅडमिरल एल. रामदास हेही हजर होते.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी सुट्टीसाठी INS विराटवर गेले होते, ही गोष्ट पूर्णपणे चूक आणि खोटी आहे, असे सांगत अॅडमिरल एल. रामदास पुढे म्हणाले, “आम्ही त्रिवेंद्रम येथून राजीव गांधी यांना सोबत घेतले. राजीव गांधी हे नॅशनल अॅथलेटिक्सचे प्रमुख होते. लक्षद्विप येथे खेळाचे कार्यक्रम होते, त्यासाठी ते तिथे आले होते. दोन दिवस ते तिथे होते. नंतर निघून गेले. यावेळी राजीव गांधी आयलँड फिरले. कारण ते आयलँड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष होते. त्यासाठी त्यांनी तिथे मिटिंगही आयोजित केली होती. मात्र, त्याआधी आयलँड फिरुन त्यांनी माहिती घेतली. त्यामुळे राजीव गांधी हे वैयक्तिक सहलीसाठी आयलँडवर आले होते, हे खोटे आहे.”

“राजीव गांधी ज्यावेळी INS विराटवर आले, त्यावेळी मी साऊथर्न नवल कमांडचा फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ होतो. INS विराटवर कुठल्याही प्रकराची पार्टी झाली नाही.” असे अॅडमिरल एल. रामदास यांनी स्पष्ट केले.

वाचा : खरंच ‘INS विराट’चा राजीव गांधींनी टॅक्सीसारखा वापर केला होता?

“सैन्याचा वापर राजकीय मुद्द्यांसाठी करणं पूर्णपणे चूक आहे. नाहीतर उद्या तुम्ही सैन्याचे सुद्धा खासगीकरण कराल. सैन्य कुणाचीही खासगी गोष्ट नाहीय. आम्ही नागरी प्रशासनाचे निश्चितच आदर करतो, मात्र याचा अर्थ असा नाही की, आम्ही त्यांची हुजरेगिरी करु. आम्ही (सैन्य) देशाचे आहोत आणि देशाचेच राहू.”, असेही अॅडमिरल एल. रामदास म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी (8 मे) पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. 1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी 10 दिवसांच्या सहलीसाठी बेटावर जाताना आयएनएस विराट या युद्धजहाजाचा टॅक्सीप्रमाणे उपयोग केल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी आरोप करताना सहलीच्या ठिकाणाचा मात्र उल्लेख केला नाही. त्यानंतर राजीव गांधींची ही सहल नेमकी कोणत्या बेटावर झाली होती याबद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें