AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samudrayaan | चांद्रयान-3 नंतर आता समुद्रयान, भारताची खास सबमर्सिबल, काय आहे प्रोजेक्ट?

Samudrayaan | 'मत्स्य' नावाची ही खास पाणबुडी बनवली आहे. काय आहे भारताच मानवी मिशन?. फक्त अमेरिका, रशिया, जापान, चीन आणि फ्रान्स या देशांनाच सबमर्सिबल डेव्हल्प करता आली आहे. मिशनमागे उद्देश काय आहे?

Samudrayaan | चांद्रयान-3 नंतर आता समुद्रयान, भारताची खास सबमर्सिबल, काय आहे प्रोजेक्ट?
Project Samudrayaan
| Updated on: Sep 11, 2023 | 3:56 PM
Share

मुंबई : चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताच आता मिशन आदित्य एल 1 ही सूर्य मोहीम सुरु आहे. भारतीय वैज्ञानिक प्रोजेक्ट समुद्रयानची सुद्धा तयारी करत आहेत. महासागराच्या पोटात 6,000 मीटर खोलवर सबमर्सिबल पाठवण्यात येणार आहे. प्रोजेक्ट समुद्रयान ही भारताची मानवी मोहीम आहे. धातू आणि खनिजांचा शोध घेणं हा प्रोजेक्ट समुद्रयानचा उद्देश आहे. समुद्राच्या पोटात असलेल्या कोबाल्ट, मँगनीज आणि निकेल सारख्या खनिजांचा शोध घेण्यात येईल. मागच्या दोन वर्षांपासून ‘मत्स्य’ 6000 सबमर्सिबलची बांधणी सुरु आहे. बंगालच्या उपसागरात 2024 च्या सुरुवातीला ‘मत्स्य’ 6000 सबमर्सिबलच्या चाचण्या सुरु होतील. जून 2023 मध्ये टायटॅनिकचा ढिगारा पाहण्यासाठी गेलेल्या टायटन सबमर्सिबलचा स्फोट झाला होता. त्यामुळे ‘मत्स्य’ 6000 च्या डिझाझनची पुन्हा एकदा अत्यंत बारकाईने तपासणी सुरु आहे.

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ ‘मत्स्य’ 6000 ची बांधणी करत आहेत. त्यांनी डिझाइनची पाहणी केली. “खोल समुद्रात शोधकार्य हे मिशन समुद्रयानच उद्देश आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीत आम्ही 500 मीटर खोलीवर पहिली चाचणी करणार आहोत” असं पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी ही माहिती दिली. मुख्य मिशनला 2026 मध्ये सुरुवात होणार आहे. फक्त अमेरिका, रशिया, जापान, चीन आणि फ्रान्स या देशांनाच सबमर्सिबल डेव्हल्प करता आली आहे. सबमर्सिबलमधून किती जणांना समुद्राच्या तळाशी पाठवणार?

कोबाल्ट, मँगनीज आणि निकेलशिवाय रासायनिक जैवविविधता, हायड्रोथर्मल वेंट आणि कमी तापमानातील मिथेनचा शोध घेण्यात येईल. या मिशनमध्ये भारत तीन जणांना ‘मत्स्य’ सबमर्सिबलमधून पाठवणार आहे. 6000 मीटर खोलीच प्रेशर घेण्याची या सबमर्सिबलची क्षमता आहे. सलग 12 ते 16 तास पाण्याखाली राहून ही सबमर्सिबल काम करु शकते. 96 तास पुरेल इतक्या ऑक्सिजनची व्यवस्था मस्त्यमध्ये असेल. ‘मत्स्य’ 6000 सबमर्सिबल समुद्राच्यावर असणाऱ्या जहाजाच्या संपर्कात असेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?