Chandrayaan 3 successful Launch : चांद्रयान 3 च्या यशस्वी लॉन्चनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

Chandrayaan 3 successful Launch : लॉन्चिंगच्या तिन्ही स्टेज यशस्वी झाल्यानंतर टाळयांचा एकच कडकडाच झाला. चांद्रयान 3 ला अवकाशाच्या अचूक कक्षेत सोडल्यानंतर LVM रॉकेट चांद्रयान 3 पासून वेगळं झालं.

Chandrayaan 3 successful Launch : चांद्रयान 3 च्या यशस्वी लॉन्चनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
narednra modi on Chandrayaan 3
| Edited By: | Updated on: Jul 14, 2023 | 4:04 PM

नवी दिल्ली: भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेला आजपासून शुभारंभ झाला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन भारताच चांद्रयान 3 आज यशस्वीरित्या अवकाशाच्या दिशेने झेपावलं. हा समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. LVM रॉकेट म्हणजे फॅट बॉयने चांद्रयान 3 च यशस्वी प्रक्षेपण केलं. लॉन्चिंगच्या तिन्ही स्टेज यशस्वी झाल्यानंतर टाळयांचा एकच कडकडाच झाला. चांद्रयान 3 ला अवकाशाच्या अचूक कक्षेत सोडल्यानंतर LVM रॉकेट चांद्रयान 3 पासून वेगळं झालं.

चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगचा क्षण अनुभवणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन आला होता. काही मिनिटाचा हा लॉन्च सोहळा पाहताना प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना होती तसच ह्दयात धकधकही सुरु होती.

‘आजचा दिवस ऐतिहासिक’

इस्रोने लाँन्चचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याच जाहीर करताच सर्वांना आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन वैज्ञानिकांच अभिनंदन केलं. याआधी सकाळी सुद्धा त्यांनी खास टि्वट केलं होतं. त्यात त्यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच म्हटलं होतं.
आता सुरु होणार अवघड टप्पा.

चांद्रयान 3 आणखी 40 दिवसानंतर चंद्रावर लँड करणार आहे. 23 ते 24 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगची इस्रोची योजना आहे. त्याआधी इस्रोच्या वैज्ञानिकांना अवकाश कक्षेत अनेक अवघड मोहिमा पार पाडाव्या लागणार आहेत. 2019 मध्ये चांद्रयान 2 मोहिम शेवटच्या टप्प्यात फसली होती. आता त्या चूका टाळून मिशन यशस्वी करण्यात इस्रोच लक्ष्य आहे.

मोदींनी टि्वटमध्ये काय म्हटलय?

चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते सध्या फ्रान्समध्ये आहेत. “भारताच्या अवकाश प्रवासात चांद्रयान 3 ने एक नवीन अध्याय लिहिला आहे. भारतीयांची महत्वकांक्षा आणि स्वप्न यातून दिसतं. या ऐतिहासिक क्षणातून वैज्ञानिकांची मेहनत दिसून येते. त्यांना माझा सलाम” असं मोदिंनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.