AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमार यांच्यानंतर आता CJI सूर्यकांत, त्या डिलिट केलेल्या ट्विटने चर्चेला उधाण, नेमकं काय घडतंय?

गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात वातावरण चांगलंच तापलं आहे. सीजेपीच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं, दुसरीकडे काँग्रेसने देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्यानंतर आता CJI सूर्यकांत, त्या डिलिट केलेल्या ट्विटने चर्चेला उधाण, नेमकं काय घडतंय?
cji suryakant Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 8:52 PM
Share

कॉकरोच जनता पार्टी आणि काँग्रेसच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. कॉकरोच जनता पार्टी सीजेपीच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये सीजेपीच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला काही विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिला. एकीकडे सीजेपीच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेसने देखील याच मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.  काँग्रेसकडून देखील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे.

काँग्रेसे नेते राहुल गांधी यांनी एसआयआरच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर देखील आरोप केले. त्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसकडून दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलं. दरम्यान एकीकडे काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच दुसरीकडे केरळ काँग्रेसने केलेल्या एका ट्विटची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे ट्विट केरळ काँग्रेसकडून सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल करण्यात आलं होतं. मात्र काही वेळातच हे ट्विट ट्विटर हँडलवरून डिलिट करण्यात आलं आहे.

या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं होतं? 

जर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं त्यांचं काम नाहीये तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्या जागी आम्ही एखादा दुसरा व्यक्ती शोधू, जो कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकेल असं ट्विट केरळ काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर लगेचच हे ट्विट डिलिट करण्यात आलं आहे. मात्र तोपर्यंत हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं.

सध्या ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं होतं की, या आंदोलनामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे, ती स्थिती आपल्या अधिकार क्षेतात येत नसून, तो कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आहे. दरम्यान त्यानंतर काँग्रेसकडून हे ट्विट करण्यात आलं होतं. त्यानंतर ते डिलिट करण्यात आलं.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान