
दुधामुळे जर तोंड जळालं तर माणूस ताक पण फुकून फुकून पितो असं म्हटलं जातं. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला मार्ग पूर्णपणे बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देवघर येथील सभेतील भाषण जर पाहिले तर ते लक्षात येईल. ‘अटॅक इज द बेस्ट डिफेन्स’ असे म्हटले जाते. पंतप्रधान मोदी सध्या त्याचाच वापर करत आहेत. आरक्षणाचा मुद्दा विरोधकांनी जोर लावून धऱला आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या निकालातून भाजपने धडा घेतला. ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि काँग्रेसने भाजपच्या विरोधात प्रचार केला. राहुल गांधी यांनी थेट हल्लाबोल केला. हेतूंवर प्रश्न उपस्थित केला. आरक्षण संपवणे हा त्यांचा एकमेव उद्देश असल्याचे म्हटले. त्यानंतर आता भाजप देखील आक्रमर झालेली पाहायला मिळतेय. एकीकडे योगी आदित्यनाथ ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत इशारा देत आहेत, तर नरेंद्र मोदी ‘एक है तो सेफ है’चा नारा देत आहेत. ...