महाकुंभनंतर अदानींची पुरी यात्रेत सेवा, लाखो भक्तांना मिळणार मोफत भोजनाचा लाभ

पुरीच्या रथयात्रेत अदानी ग्रुप 40 लाख भाविकांना मोफत जेवण आणि पाणी पुरवेल. महाकुंभानंतर ही अदानींची दुसरी मोठी सेवा आहे. स्वच्छता, आरोग्यसेवा आणि स्वयंसेवकांना साहित्य पुरवूनही मदत केली जात आहे. स्थानिक संस्था आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे काम राबवले जात असून, हे सेवाभावनेतून केले जाणारे काम आहे असे अदानी समूह सांगतो.

महाकुंभनंतर अदानींची पुरी यात्रेत सेवा, लाखो भक्तांना मिळणार मोफत भोजनाचा लाभ
gautam adani
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 26, 2025 | 6:00 PM

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभनंतर आता अदानी ग्रुपची सेवा यात्रा जगन्नाथ पुरीपर्यंत पोहोचली आहे. जगन्नाथ पुरी ही भारतातील प्रमुख धार्मिक परंपरेतील महत्त्वाची यात्रा आहे. पुरीच्या रथयात्रे दरम्यान अदानी समूह श्रद्धाळू आणि अधिकाऱ्यांना मदत करणार आहे. अदानी ग्रुपककडून येथे येणाऱ्या भक्तांना मोफत जेवण दिलं जाणार आहे.

दरवर्षी 9 दिवसाची ही रथयात्रा असते. श्री जगन्नाथ मंदिर, पुरी येथून ही यात्रा निघते. या यात्रेला देशातीलच नव्हे तर विदेशातील भाविकही मोठ्या भक्तीभावाने येत असतात. यंदा आजपासूनच म्हणजे 26 जूनपासून ही यात्रा सुरू झाली आहे. 8 जुलैपर्यंत ही यात्रा चालणार आहे. या काळात सेवेची साधना या भावनेतून अदानी ग्रुपकडून व्यापक मदत केली जाणार आहे. या अंतर्गत जवळपास 40 लाख भाविकांना भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

अदानी समूह सेवाकार्यात अग्रेसर

रथ यात्रेच्या निकटच्या शहरात अनेक ठिकाणी निशुल्क भोजन केंद्र बनवले जाणार आहेत.

ओडिशाच्या गरमीतून भक्तांना दिलासा मिळावा म्हणून थंडे पेयाचे स्टॉल ठेवण्यात येणार आहे.

पुरी बीच लाइफगार्ड महासंघालाही मदत केली जाणार आहे.

समुद्र किनारी स्वच्छता आणि प्लास्टिकचा कचरा हटवण्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.

पालिका कर्मचाऱ्यांना फ्लोरोसेंट जॅकेट दिले जाणार आहेत.

स्वयंसेवकांना मोफत टी-शर्ट्स आणि पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट, छत्री आणि टोपी दिली जाणार आहे.

पुरी जिल्हा प्रशासन, इस्कॉन आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अदानी समूह ही सेवा देणार आहे. अदानी फाऊंडेशनने ओडिशा ग्रामीण आरो्गय, शाळेची सुविधा आणि आजीविकेसाठी कार्य करत आहे. अदानी समूह या सेवेला भारतीय संस्कृतिक जीवनाचा एक अभिन्न अंग मानत आहे.

अदानी समूहाचे सामाजिक दायित्व केवळ शिक्षण आणि आरोग्यापर्यंत मर्यादित नाही, तर भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसात सक्रिय भूमिक निभावण्याचं आहे. कोणत्याही प्रचारासाठी अदानी समूह हे काम करत नाहीये, तर सेवाभावनेतून हे काम केलं जात आहे.

महाकुंभात मोठं योगदान

यापूर्वी जानेवारीत महाकुंभाच्या दरम्यानही अदानी समूहाने इस्कॉन आणि गीता प्रेसच्या सोबत मिळून मोठ्या प्रमाणावर भंडारा आणि तीर्थसेवा दिली होती. स्वत: गौतम अदानी यांनी 21 जानेवारी रोजी कुंभमधील सेवा कार्यात भाग घेतला होता. आता पुरी रथ यात्रेत अदानी समूह आता विकासाचं एक अनोखं मॉडल सादर करत आहे. त्यातून भारताची संस्कृती, समुदाय आणि करुणा झळकणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या सेवांची योजना अनेक महिन्यांपूर्वीच तयार केली जाते. स्वयंसेवक स्वत:हून अदानी समूहाशी जोडले जातात किंवा स्थानिक समुदाय अदानी समूहासोबत काम करण्यास तयार होतात. अगदी संचालनातही हेच लोक अग्रेसर असतात. कारण या क्षेत्राची त्यांना अधिक माहिती असते.