AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेमिंग बिल मंजूर होताच Dream11 चा मोठा निर्णय; लोकांच्या पैशांचं काय होणार? मोठी अपडेट समोर!

ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी देणाऱ्या गेम्सबाबत सरकारने आपले धोरण कठोर केले आहे. तशा काही तरतुदी या विधेयकात आहेत. दरम्यान, हे विधेयक संसदेत मंजूर होताच ड्रीम-11 ॲपने मोठा निर्णय घेतला आहे. या ॲपच्या मूळ कंपनीने या अॅपमधील सर्व पैसे काढून घ्या, असे आवाहन या कंपनीने केले आहे. त्यामुळे आता ड्रीम-11 ॲपच्या माध्यमातून पैसे लावणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गेमिंग बिल मंजूर होताच Dream11 चा मोठा निर्णय; लोकांच्या पैशांचं काय होणार? मोठी अपडेट समोर!
DREAM 11
| Updated on: Aug 21, 2025 | 9:32 PM
Share

Online Gaming Bill : संसदेत नुकतेच ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकात ऑनलाईन गेमिंगसंदर्भात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी देणाऱ्या गेम्सबाबत सरकारने आपले धोरण कठोर केले आहे. तशा काही तरतुदी या विधेयकात आहेत. दरम्यान, हे विधेयक संसदेत मंजूर होताच ड्रीम-11 ॲपने मोठा निर्णय घेतला आहे. या ॲपच्या मूळ कंपनीने या अॅपमधील सर्व पैसे काढून घ्या, असे आवाहन या कंपनीने केले आहे. त्यामुळे आता ड्रीम-11 ॲपच्या माध्यमातून पैसे लावणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ड्रीम-11 ॲपने नेमका काय निर्णय घेतला?

मिळालेल्या माहितीनुसार पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे. तसेच हे ॲप वापरणाऱ्या सर्वानीचा आपापले पैसे काढून घ्यावेत, असे आवाहनही कंपनीने केले आहे. दरम्यान, आता या कंपनीच्या या निर्णयानंतर ड्रीम-11 ॲप वापरणाऱ्या सर्वांनाच आपापले पैसे काढून घ्यावे लागणार आहेत.

कंपनीने आपल्या संदेशात काय म्हटलं आहे?

संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर ड्रीम-11 ॲपच्या कंपनीने हे अॅप वापरणाऱ्यांना एक आवाहन केले आहे. आम्ही आता ‘पे टू प्ले’ हा पर्याय थांबवत आहोत. फॅन्टॅसी स्पोर्ट्स कॉन्टेस्ट प्लॅटफॉर्ममध्ये हा ऑप्शन असायचा. आता हा ऑप्शन उपलब्ध नसेल, असे कंपनीने सांगितले आहे. तसेच तुमच्या खात्यातील पैसे कुठेही जाणार नाहीत. ते सुरक्षित आहेत. तसेच तुम्हाला ड्रीम-11 ॲपमधून ते काढून घेता येतील, असेही या कंपनीने सांगितले आहे.

ऑनलाईन गेमिंग विधेयकात नेमके काय आहे?

संसदेत मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकाचे नाव ऑनलाईन गेम प्रचार आणि नियमन विधेयक 2025 असे आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकारने रियल मनी गेम्सवर थेट बंदी घातली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अवघ्या 72 तासांत हे विधेयक मंजूर करण्यात आले. आता दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. सराकरच्या या विधेयकानंतर आता पे टू प्ले ऑप्शन देणाऱ्या ड्रीम-11, एमपीएल, पोकरबाजी अशा अॅप्सना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.