मोठी बातमी! चीनकडून अमेरिकेचा टप्प्यात कार्यक्रम, ट्रम्प जिनपिंग यांना घाबरले, दौऱ्यावरून परताच जगाला चक्रावून सोडणारी घोषणा
मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते, मात्र या दौऱ्यावरून परतताच त्यांनी थेट युटर्न घेतला आहे. त्यामुळे आता ट्रम्प शी जिनपिंग यांना घाबरले का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. कारण हा दौरा अशावेळी झाला की जेव्हा अमेरिका आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. चीन हा इराणचा चांगला मित्र आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे, ज्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा काही प्रमाणात चीनला देखील फटका बसला आहे. या युद्धाचा जागतिक आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. अशा स्थितीमध्ये दोन बलाढ्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक झाली. मात्र या बैठकीमधून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती विशेष काही लागलं नाही. चीनसोबत कुठलाही करार न करताच ट्रम्प परतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या उलट या बैठकीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांना उघड-उघड धमकी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. तैवानच्या मुद्द्यावरून चीनने ट्रम्प यांना स्पष्ट संदेश दिला आहे. शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की, तैवानच्या प्रश्नामध्ये अमेरिकेनं हस्तक्षेप करू नये, अन्यथा याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. जर हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला गेला नाही तर अमेरिका आणि चीनमध्ये हे युद्धाचं कारण देखील बनू शकतं.
दरम्यान सुरुवातीपासूनच अमेरिकेची भूमिका ही तैवानच्या बाजुने राहिली आहे. मात्र चीनच्या दौऱ्यानंतर आता ट्रम्प यांनी युटर्न घेतल्याचं पहायला मिळत आहे. चीनच्या दौऱ्यावरून वापस येताच त्यांनी तैवानला इशारा दिला आहे की, तुम्ही अधिकृतरित्या चीनपासून तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे, अशी घोषणा करू नका. ट्रम्प यांच्या या बदललेल्या भूमिकेची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. तसेच ट्रम्प चीनला घाबरले का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या सगळ्या प्रकरणावर फॉक्स न्यूजसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, मला कोणालाही (तैवानला) स्वातंत्र्य झालेलं पाहायचं नाहीये. तुम्हाला तर माहीतच आहे, युद्ध करायचं झालं तर आम्हाला 9,500 मैल प्रवास करावा लागतो. त्यामुळेच मला असं वाटतं की तैवानं देखील शांत रहावं आणि चीनने देखील शांत राहावं, मात्र याचा अर्थ असा होत नाही की आमच्या तैवान संदर्भातील पॉलिसीमध्ये काही बदल झाला आहे.