शिवसेना-राष्ट्रवादी नंतर आता हा पक्ष फुटण्याच्या मार्गावर, थेट भाजपच्या संपर्कात?
विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पेच वाढला आहे. दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. नाराजीमुळे ते भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यांना असंतुष्ट आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो अशी ही चर्चा आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर राज्यात मोठं राजकीय भूकंप सगळ्यांना पाहिला मिळालं. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता आणखी एका राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचा ४० आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत ही ४० आमदार होते. असंच काहीसं चित्र आणखी एका राज्यात पाहायला मिळू शकते. विधानसभा निवडणुकीच्या आधी एका पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण त्याआधी मोठी राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे. ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना जामीन मिळाल. जामीन मिळताच ते पुन्हा एकदा मुख्यंमत्री झाले. हेमंत सोरेन तुरुंगात असताना चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. पण हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर येताच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. चंपाई सोरेन यांचं पक्षात मोठं वर्चस्व आहे.
अमित शाहांची भेट घेणार?
कोल्हान भागात झारखंड मुक्ती मोर्चामध्ये चंपाई सोरेन यांचा मोठा प्रभाव आहे. चंपाई सोरेन यांच्यासह कोल्हाण भागातील अनेक आमदारही त्यांना पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या चंपाई सोरेन त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आहेत. लवकरच ते रांचीला पोहोचण्याची शक्यता आहे. चंपाई सोरेन लवकरच नवी दिल्लीला जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊ शकतात. मात्र सध्या याला कोणत्याही स्तरावर दुजोरा दिला जात नाही.
हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड भाजपचे सह-निवडणूक प्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी चंपाई सोरेन यांचे कौतुक केले आहे. भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी त्यांचं कौतूक केलंय. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, 2019 पासून हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून लोकांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत, राज्य सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. चंपाय सोरेन यांच्या सुमारे सहा महिन्यांच्या कार्यकाळात थोडेच काम झाले. झारखंड मुख्यमंत्री मैयान योजना देखील चंपाई सोरेन सरकारने दिली आहे. या
मंत्री चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री आणि मंत्री चंपाई सोरेन यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून ते चंपाई सोरेन यांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
