AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफ झाला आता डोनाल्ड ट्रम्प देणार आणखी एक मोठा धक्का? व्हाईट हाऊची भारताला उघड धमकी

अमेरिकेच्या अलस्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये एक बैठक झाली होती, या बैठकीनंतर आता मोठी बातमी समोर येत आहे.

टॅरिफ झाला आता डोनाल्ड ट्रम्प देणार आणखी एक मोठा धक्का? व्हाईट हाऊची भारताला उघड धमकी
| Updated on: Aug 18, 2025 | 3:08 PM
Share

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अलस्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये एक बैठक झाली, या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली, या बैठकीकडे भारताचं लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर ट्रम्प भारतावर लावलेला टॅरिफ कमी करू शकतात असा अंदाज होता. मात्र आता तसं होताना दिसत नाहीये. अमेरिकेकडून रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भारताला धमकी देण्यात आली आहे.

पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीनं भारताला धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू मानले जाणारे आणि व्हाइट हाउसचे ट्रेड सल्लागार पीटर नवारो यांनी तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारताला पुन्हा धमकी दिली आहे.भारत ज्या पद्धतीनं रशियाकडून तेल खरेदी करत आहे, ते पाहाता त्यांना लवकरच रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागेल असं पीटर नवारो यांनी म्हटलं आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करत आहे, आणि त्या पैशांमधून रशियाला युक्रेनविरोधात लढण्यासाठी मदत मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावीच लागेल असं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आधीच स्पष्ट केलं आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्याला अयोग्य प्रकार टार्गेट केलं जात आहे. कारण खुद्द अमेरिका आणि यूरोपीय यूनियन रशियाकडून वस्तुंची खरेदी करते, त्यांनी हा व्यापार सुरूच ठेवला आहे. दरम्यान भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे येत्या 28 ऑगस्ट पासून भारतीयवस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे.

दरम्यान अमेरिकेनं जरी भारतावर टॅरिफ लावला असला तरी देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. आमच्यासाठी आमच्या देशाचं हीत सर्वात आधी आहे, अशी भूमिका यावर भारतानं आधीच स्पष्ट केली होती, पण भारताचा हा निर्णय अमेरिकेच्या काही पचनी पडण्याचं दिसत नाहीये, अमेरिकेकडून पुन्हा भारताला धमकी देण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...